Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील लोकप्रिय शहरांपैकी एक आहे. या शहराचा इतिहास या शहराची ओळख सांगतो. पुण्यात अशा अनेक जुन्या गोष्टी आहेत, ठिकाणे आहेत जे बघायला लोक दुरवरून येतात. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्याचा खूप विकास झाला आहे. पुण्याच्या विकासामध्ये मेट्रोचे एक महत्त्वाचे स्थान आहे. पुण्यात अनेक भागात मेट्रो सुरू आहे तर काही भागात मेट्रोचे काम सुरू आहे. येत्या काळात पुणे पूर्णपणे मेट्रो सिटी म्हणून ओळखली जाईल. तुम्ही पुण्यातील सात मजली मेट्रो स्टेशन पाहिले आहे का? होय, सात मजली. सध्या या मेट्रो स्टेशनचा व्हिडीओ सोशल मीडियाचा चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सात मजली मेट्रो स्टेशन दिसेल. अत्यंत स्वच्छ व सुंदर हे स्टेशन आहे. हे स्टेशन अतिशय भव्य असून या स्टेशनची रचना अतिशय आकर्षक आहे. मेट्रो स्टेशनवर प्रवाशांची अतिशय व्यवस्थितपणे सुव्यवस्था करण्यात आली. हे मेट्रो स्टेशन पाहून कोणीही थक्क होईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुण्यात सात मजली मेट्रो स्टेशन कोणते आहे? तर हे सात मजली जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन आहे. हे इंटरचेंज मेट्रो स्टेशन आहे. येथे दोन मेट्रो स्टेशन आहे. एक अंडर ग्राउंड आणि दुसरे एलिव्हेटेड . आशिया खंडातील हे सर्वात खोल मेट्रो स्टेशन असल्याचे मानले जाते.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
ek_puneri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्यात असलेल्या या सात मजली मेट्रो स्टेशनला तुम्ही कधी गेला आहात का?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सात मजली पण जमीनीच्या आत” तर एका युजरने लिहिलेय, “मला रील बघितल्यावर समजले सात मजली आहे. खतरनाक आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “गुटखा खाऊन थुंकू नका फक्त येवढच करा !” अनेक युजर्स ही रील पाहून थक्क झाले आहेत. काही लोकांनी या मेट्रो स्टेशनला भेट दिल्याचे सांगत आपला अनुभव सांगितला आहे.