Viral Video : अनेकांनी कोंबडी, चिमणीला अंडी देताना पाहिले असेल पण तुम्ही कधी सापाला अंडी देताना पाहिले आहे का? हो, सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये साप चक्क अंडी देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. जेव्हा तुम्ही सापाला अंडी देताना पाहाल तेव्हा सुद्धा तुमच्या अंगावर शहारे येऊ शकतात. सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा सुरू आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक साप दिसेल. हा साप अंडी देत आहे. विशेष म्हणजे खूप कमी लोकांना माहिती असेल की साप तोंडातून अंडी देतो. या व्हिडीओत सुद्धा साप तोंडातून सात अंडी बाहेर फेकताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही अचंबित व्हाल. सापाचा अंडी देतानाचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Jugaad Video : आता क्षणात फोडता येईल भुईमुगाच्या शेंगा, हटके जुगाडचा व्हिडीओ होतोय व्हायरल
junja_vlog या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला आज माहिती पडले की साप तोंडातून अंडी देतो” तर एका युजरने लिहिलेय, “मी पहिल्यांदा पाहिले” काही युजर्सनी हर हर महादेव लिहिले आहेत.