Viral Video : बुधवारी देशभरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. हिंदू धर्मात रामनवमी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान श्री रामाचा जन्म झाला होता. यंदाची राम नवमी ही खूप खास होती कारण राम जन्मभूमी अयोध्या येथे नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात याच वर्षी जानेवारी मध्ये राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. रामनवमी निमित्त अयोध्येत सुद्धा रामभक्तांचा उत्साह पाहायला मिळाला. या खास दिवशी अयोध्या लखलखत्या दिव्यांनी उजळून निघाली होती.
अयोध्येतील अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच अयोध्येतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये एक चिमुकला रामलल्लांच्या मूर्तीसारखा शृंगार करून आला आहे. या चिमुकल्याकडे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या चिमुकल्याला पाहून काही लोकांना ही साक्षात राम लल्लाची मूर्ती आहे की काय असे वाटू शकते. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : बापरे! हिरव्या रंगाचे ढग आले दाटून! पाहा, दुबईतील वादळाचा धडकी भरवणारा Video…
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकला प्रभू रामलल्लांचा वेषपरिधान करून आला आहे. त्याचा लूक हुबेहूब रामलल्लांसारखा दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील तेज पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या या व्हिडिओची चांगलीच चर्चा सुरू आहे. अनेक लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. एएननाय (ANI) दिलेल्या माहितीनुसार , या चिमुकल्या मुलाचे नाव के आयुष्मान राव असून तो मूळचा छत्तीसगढच्या बिलासपुर शहरातील आहे.
पाहा व्हायरल व्हिडिओ
हेही वाचा : Pune : पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठेला ‘तुळशीबाग’ हे नाव कसे पडले? जाणून घ्या, या नावामागचा इतिहास
व्हायरल विडिओवर अनेक युर्जसनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युर्जरनी लिहिलेय, “रामासाठी लोकांच्या मनात असलेली ही पवित्र श्रद्धा आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “जय श्री राम” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरा रामभक्त”