Viral Video : नुकताच ख्रिसमस सगळीकडे उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिसमस हा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता सण आहे. सोशल मीडियावर ख्रिसमस सेलिब्रेशनचे आणि सांताक्लॉजचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सांताक्लॉज हे ख्रिश्चन धर्मातील एक काल्पनिक पात्र आहे. लहान मुलांना सांताक्लॉज खूप आवडतो कारण सांता लहान मुलांना भेटवस्तू देतो. ख्रिसमसच्या निमित्त्याने लहान मुले आतुरतेने सांताक्लॉजची आतुरतेने वाट पाहतात. तुम्ही अनेकदा लाल पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालून आणि शुभ्र पांढरी दाढी वाढलेला सांताक्लॉज बघितला असेल पण तुम्ही कधी हरे राम हरे कृष्णा म्हणणारा सांता पाहिला आहे का?

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. सर्व धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांच्या सणावारात सहभागी होतात. एकत्र एकोप्याने राहतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सांताक्लॉज चक्क हरे राम हरे कृष्णा म्हणताना दिसत आहे.

Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
deepika padukone ranveer singh christmas celebration with baby Dua
Christmas 2024: वरुण धवनने पहिल्यांदाच शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा फोटो; दीपिका-रणवीरने मुलीसह ‘असं’ केलं सेलिब्रेशन
Maharashtrachi Hasya Jatra Fame Onkar Raut
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…
raigad beaches crowded with tourists
रायगडचे किनारे पर्यटकांनी गजबजले, पर्यटन हंगामाला सुगीचे दिवस
Yogita Chavan & Saorabh Choughule
Video : सातजन्म हाच नवरा मिळूदेत! योगिता चव्हाणला ख्रिसमस आवडतो म्हणून पती सौरभने दिलं ‘असं’ Surpirse, पाहा व्हिडीओ
Julio Ribeiro Christmas memories loksatta article
ख्रिसमसच्या काही आठवणी…
christmas celebration thane city
नाताळासाठी बाजार सजले, ऑनलाईन बाजारपेठांमध्ये विशेष सवलती; सांताच्या टोपी, पोशाखाला ग्राहकांची मागणी

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की कृष्णभक्त लोक आणि सांताक्लॉज रस्त्यावर हरे राम हरे कृष्णा म्हणताना दिसत आहे. यावेळी कृष्ण भक्तांच्या हातात टाळ आणि ढोलकी दिसत आहे. ढोलकी आणि टाळच्या गजरात हे सर्व हरे राम हरे कृष्णाचे नाव गाताना दिसत आहे. विशेष म्हणजे सांताक्लॉज सुद्धा त्यांच्याबरोबर हरीनामाचा गजर करताना दिसत आहे. हरीनामाच्या गाण्यावर सांताक्लॉज नाचताना सुद्धा दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. विविधतेत एकता ही आपल्या देशाची एक वेगळी ओळख आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भारावून जाईल.

हेही वाचा : “…मन का विश्वास कमजोर हो ना” चिमुकलीने इतक्या निरागसपणे म्हटली प्रार्थना की पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल

अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून सांताचे कौतुक केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला हा सांता खूप आवडला” तर एका युजरने लिहिलेय, “इतर धर्माचा आदर राखणे, हाच मोठेपणा आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे फक्त सांताच करू शकतो” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर मेरी ख्रिसमस म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत तर काही युजर्सनी जय श्री राम लिहिले आहेत. wo_krishna_hai_bro या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Story img Loader