Pune Viral Video : पुणे हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे आणि गडकिल्ले बघण्यासाठी दूरवरून लोक येतात. पुण्याजवळ असलेल्या सिंहगडाला लोक आवर्जून भेट देतात. रविवारी या ठिकाणी भयंकर गर्दी असते. पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड किल्ला पुण्यातील एक लोकप्रिय किल्ला आहे. पुण्यापासून ३० -३५ किमी अंतरावर असलेला किल्ला आजही इतिहासाची साक्ष देतो. दरदिवशी हजारो लोक सिंहगडाला भेट देतात आणि तेथील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. तुम्ही सिंहगडाजवळ असलेले शिवलिंग पाहिले आहे का?
सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने सिंहगडाजवळील शिवलिंग दाखवले आहे.तुम्हाला प्रश्न पडला असेल हे शिवलिंग नेमके कुठे आहे. आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण सांगतो, “तुम्ही सिंहगडावर गेला असाल पण तुम्हाला माहिती आहे का सिंहगडाजवळ असलेलं शिवलिंग? जय श्री राम मित्रांनो, सकाळी लवकर उठलो होतो. मग कुठेतरी फिरून यावं म्हणून सकाळी ५ वाजता निघालो. मस्त असा खडकवासल्याचा व्ह्यू पाहत सिंहगडाकडे. गडावर जायच्या आधी अर्ध्या रस्त्यात एक छोटेखानी चंबू सारखा डोंगर दिसतो. तिथे जायला फक्त १० ते १५ मिनिटे लागत असून फक्त शेवटी एक कातळ टप्पा पार केला की आपल्याला शिवलिंग नजरेज पडते. खरंच येथून खूप सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो.
पाहा व्हिडीओ (Watch Video)
happie_hiker07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शिव हि सब है
ठिकाण:- सिंहगड घाटात जो छोटेखानी चंबू सारखा डोंगर दिसतो तिथे पोहचायला २० मिनिटे लागतात, रस्ता सोप्या श्रेणीचा असून, शिवलिंग जवळ जायला फक्त शेवटी एक कातळ टप्पा पार करून शिवलिंग नजरेस पडतो. खरच येथून आपल्याला शांत असं निसर्गरम्य दृश्य अनुभवला मिळते.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “शिखर महादेव” तर एका युजरने लिहिलेय, “बटाटा पॉइंट” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी आजच सकाळी जाऊन आलो. तिथं बिबट्याच्या पिल्लांचा आवाज येत होता. जाताना काळजी घ्या मित्रांनो” एक युजर लिहितो, “आजूबाजूचा एकदम छान व्ह्यू आहे मी पण जाऊन आलो आहे या मंदिरात”