Signature of Alia, Ranbir and Vicky : बॉलिवूड सिनेस्टार हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या आवडत्या सिनेस्टार लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे आणि त्यांना काय आवडतं, याची नेहमी प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यासाठी अनेकदा सोशल मीडियावर लोकं त्यांना फॉलो करताना दिसतात. पूर्वी एखाद्या आवडता कलाकार दिसला की लोकं त्याची स्वाक्षरी घ्यायला रांगा लावायचे पण कालांतराने स्वाक्षरीची जागा सेल्फी किंवा फोटोने घेतली. त्यामुळे आताच्या सिनेस्टारच्या स्वाक्षरी अनेकांना माहिती नाही.

तुम्ही रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विक्की कौशलची स्वाक्षरी पाहिली आहे का? सध्या त्यांच्या स्वाक्षरीचा एक फोटो व्हायरल होत आहे. अभिनेत्री आलिया भट्टनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये रणबीर, आलिया आणि विक्की कौशलची स्वाक्षरी आहे. तुम्ही त्यांची स्वाक्षरी पाहिली का?

Check Mohammad Shami Sania Mirza marriage fact check photo
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा अडकले विवाहबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; पण सत्य काय? वाचा
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
janhvhi kapoor share her paintings
जान्हवी कपूर आहे उत्कृष्ट चित्रकार, रेखाटलं सुंदर चित्र; तुम्हालाही काढायचं आहे? जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स
nitish kumar Rahul Gandhi fact check photo
बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुख्यमंत्री नितीश कुमार, तेजस्वी यादव अन् राहुल गांधीच्या VIRAL PHOTO मुळे चर्चांना उधाण; वाचा खरं काय?
pv sindhu wedding first picture Indian Badminton Star Tied Knot with Venkat Datta Sai
PV Sindhu Wedding: पीव्ही सिंधूने बांधली लग्नगाठ, विवाह सोहळ्यातील पहिला फोटो आला समोर
elvish yadav reacts on video with hardik pandya ex wife Natasa Stankovic
हार्दिक पंड्याच्या वाढदिवशी नताशाबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ जाणूनबुजून टाकला? एल्विश यादव म्हणाला, “मी त्यादिवशी…”
Reshma Shinde
Video: सुंदर सजावट अन् फुलांची उधळण; रेश्मा शिंदेने शेअर केला हळदीचा व्हिडीओ
aishwarya rai with mother daughter aaradhya video viral
Video : ऐश्वर्या राय बच्चनचा आई अन् लेकीबरोबरचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “तीन पिढ्या…”

आलियाने शेअर केलेली पोस्ट एका आगामी चित्रपटाबाबत आहे. संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट ‘लव्ह अँड वार’ (Love & War) याची घोषणा या पोस्टमध्ये शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलेय, “आम्ही घेऊन आलोय संजय लीला भन्साळी यांची भव्य गाथा ‘लव्ह अँड वार’ ख्रिसमस २०२५ मध्ये चित्रपटगृहात पाहू या.” या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांनी खाली स्वाक्षरी केली आहे. त्यात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विक्की कौशलची स्वाक्षरी आहे. या तीन स्वाक्षरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा : “तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची..” अंध बांधवांनी केली किल्ले राजगडाची सैर

आलियाने तिच्या aliaabhatt या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर केली असून या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्स स्वाक्षरी पाहून गमतीशीर प्रतिक्रिया देताना दिसले. अनेक युजर्सनी आलियाची स्वाक्षरी खूप आवडली आहे. काही युजर्सनी आलियाच्या स्वाक्षरीत क्रिएटिव्हीटी दिसत असल्याचे लिहिलेय. एका युजरने लिहिलेय, “मला सर्वात जास्त रणबीरची स्वाक्षरी आवडली आहे” तर एका युजरने लिहिलेय, “विक्की कौशलची स्वाक्षरी खूप हटके दिसत आहे.” आणखी काही युजर्सनी या आगामी चित्रपटाबाबत उत्सूक असल्याचे लिहिलेय. विक्की, रणबीर आणि आलिया यांच्या एकत्रित येत असलेल्या चित्रपटाची घोषणा ऐकून चाहते खुश झाले आहेत.

Story img Loader