Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण आवडीने व्हिडीओ शेअर करत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात तर काही व्हिडीओ मजेशीर असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती दिसेन. तुम्ही व्हिडीओ नीट बघाल तर तुम्हाला दिसेल की या व्यक्तीला रस्त्याने नीट चालता सुद्धा येत नाही. फक्त चालण्यासाठीचा त्याचा संघर्ष पाहून तुम्हालाही पोट धरुन हसायला येईल. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. तुम्हाला या व्हिडीओत एक व्यक्ती दिसणार. ही व्यक्ती पाठीवर बॅग घेऊन रस्त्यानी जाताना दिसत आहे पण त्याला नीट चालता सुद्धा येत नाही. सुरुवातीला तो भिंतीला धरुन चालताना दिसतो पण पुढे जेव्हा रस्ता लागतो तेव्हा त्याला भिंतिचा आधार घेता येत नाही आणि मग पुढे रस्त्यावरुन चालताना त्याचा वारंवार तोल जातो. कधी तो डाव्या बाजूला पडेल का तर कधी उजव्या बाजूला पडेल का, असे वाटते. त्याला पाहून तुम्हाला अंदाज येईल की त्याने मद्यपान केले आहे. त्याचा हा फक्त चालण्यासाठीचा संघर्ष पाहून कदाचित तुम्हाला हसू आवरणार नाही.
३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर काही लोक मद्यपान करतात. सोशल मीडियावर मद्यपान करणाऱ्या लोकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातलाच हा व्हिडीओ सध्या चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : VIDEO : भर वर्गात तास चालू असताना झोपला होता विद्यार्थी, शिक्षकांनी पकडताच अनोखी शक्कल लढवून स्वत:ला वाचवले

nusta_jal_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “केवढा तो संघर्ष ते पण फक्त चालण्यासाठी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे परतीचे वारे आहेत” तर एका युजरने लिहिलेय, “एनर्जी ड्रिंक” आणखी एका युजरने लिहिलेय, “१ जानेवारीची सकाळ” या व्हिडीओवर काही युजर्सनी हसण्याचे इमोजी सुद्धा शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you see struggle of a man for walking by watching video you can not stop laughing ndj
Show comments