Viral Video : सोशल मीडियावर महाकुंभ मेळ्यातील अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही व्हिडीओ मजेशीर आहेत तर काही व्हिडीओ थक्क करणारे आहेत. महाकुंभ मेळ्यातील काही व्हिडीओ अतिशय व्हायरल झाले सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण त्याच्या आईची सेवा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. (Mangal Margi 2025 three zodiac signs get money wealth after 18 days)

जगातील सर्वात श्रीमंत आई पाहिली का? (Do you see the richest mother in the world)

आई आणि मुलांचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, आपुलकी, काळजी अन् जिव्हाळा असतो. आई आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करते. म्हातारापणी मुलांनी आपल्याला साथ द्यावी, आपली सेवा करावी हीच अपेक्षा आईवडिलांची असते. सध्या असाच हा महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला महाकुंभ मेळ्यात आलेले एक कुटुंब दिसेल. व्हिडीओत तुम्हाला आईवडील थकून खाली बसलेले दिसत आहे. आईचे खूप पाय दुखत आहे त्यामुळे तिचे दोन मुले तिचे पाय दाबताना दिसत आहे. आईची सेवा करणाऱ्या या दोन तरुणांना पाहून कोणीही भावुक होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “ती सर्वात श्रीमंत आई आहे”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

boga_best_one या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जगातील सर्वात श्रीमंत आई” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हेच खरं कुंभ आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खरंच सर्वात नशीबवान आहे ही आई” आणखी एका युजरने लिहिलेय, “कुंभ आपके घर मे ही तुम्हाला कुठेही जायची गरज नाही” एक युजर लिहितो,”आई वडिलांच्या चरणीच पुण्य मिळतं.” तर एक युजर लिहितो, “चांगल्या कर्माचे फळ आहे हे”

Story img Loader