Viral Video : पुणे हे एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराचा इतिहास या शहराची ओळख सांगतो. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले तसेच अनेक जुने ठिकाणांना भेट देण्यासाठी दुरवरून लोक येतात पण पुण्यात असे अनेक ठिकाणे आहेत ज्याविषयी पुण्यातील काही लोकांनाच माहिती नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्याजवळील एका ठिकाणाविषयी सांगितले आहे. हे ठिकाण इतके सुंदर आहे की पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
पुण्याजवळचा हा सुंदर तलाव पाहिला का?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर तलाव दिसेल. हा तलाव पाहून कोणीही थक्क होईल. या तलावाच्या आजुबाजूला सुंदर हिरवागार परिसर दिसत आहे. तलावाच्या शेजारी लोक बसलेले दिसत आहे तर काही लोक खेळताना दिसत आहे. हा सुंदर व शांत परिसर पाहून कोणीही मंत्रमुग्ध होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हा सुंदर तलाव पुण्याजवळी कुडजे गावात आहे. हे कुडजे गाव खडकवासला पासून फक्त १० किमीवर आहे. आपल्यापैकी अनेकांना या ठिकाणाविषयी माहिती नसेल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
advitiyapune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खकडकवासला पासून फक्त १० किलोमीटर वर असलेलं हे ठिकाण कुडजे, पुणे “
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आता तिथं पण गर्दी होणार” तर एका युजरने लिहिलेय, “कशाला लोकेशन सांगतो. तुम्ही एन्जॉय करून आला मग बस्स! रील बघून जाणारे त्या जागेचं वाटोळं करतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “असे ठिकाण शेअर करू नका. ते ठिकाण सुंदर दिसण्यास पात्र आहे.”
यापूर्वी सुद्धा पुण्याजवळच्या अशा अनेक ठिकाणचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्याजवळच्या अशाच एका ठिकाणचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पुण्यातील एक सुंदर गार्डन आणि आकर्षक असा तलाव दाखवला होता. ते पुण्यातील प्रसिद्ध असे पु. ल. देशपांडे गार्डन होते. हे गार्डन सिंहगड रोडवर स्थित आहे. हे गार्डन ‘पुणे ओकायामा मैत्री गार्डन’ या नावाने सुद्धा ओळखले जाते.