Viral Video : सोशल मीडियावर अनेक युजर्स नवनवीन गोष्टी शेअर करत असतात. काही गोष्टी मजेशीर असतात तर काही गोष्टी थक्क करणाऱ्या असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क पाण्याचे कुंड दाखवले जात आहे. एक तरुण महाराष्ट्रातील एका नैसर्गिक गरम पाण्याचे कुंडाविषयी माहिती सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आजवर तुम्ही थंड पाण्याचे कुंड पाहिले असेल पण गरम पाण्याचे कुंड पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक गरम पाण्याचे कुंड दिसेल. तेथून गरम पाण्याचे झरे वाहताना दिसेल.या व्हिडीओत एक तरुण या गरम पाण्याच्या कुंडाविषयी माहिती सांगतो, “आम्ही रत्नागिरीला जात असताना आम्हाला वाटेत एक गरम पाण्याचे कुंड दिसले. तुम्ही हे कुंड व्हिडीओत पाहू शकता. रत्नागिरी चिपळून हायवेला राजेवाडी गाव आहे, तेथील हे कुंड आहे. तुम्हाला दिसेल की या पाण्यातून गरम पाण्याची वाफ निघताना दिसत असावी. तुम्हाला उकळलेले पाणी दिसत असावे.कुंडात पाणी साचू नये म्हणून पाईपच्या मदतीने हे पाणी कुंडातून बाहेर सुद्धा पडताना दिसत आहे. तुम्ही येथे पाहाल की या गरम पाण्यामुळे बेडूकचा मृत्यू झाला. हे खरंच आहे मित्रांनो, मी सुद्धा पाहून थक्क झालो.या पाण्याला तुम्ही हात सुद्धा लावू शकत नाही. अंघोळ सुद्धा करू शकत नाही, एवढं हे गरम पाणी आहे.
birajdarakash25 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आमच्या गावी पण आहे हे गरम पाण्याचे कुंड, दापोली तालुक्यातीस उनव्हारे गावात.” तर एका युजरने लिहिलेय, “हे खरंय. आम्ही येथे जाऊन आलोय.” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझ्या नणदेकडे चिपळूनला जाताना लागतो हा कुंड. खरंच हा कुंड गरम पाण्याचा आहे.”