Dance Video : सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही डान्स व्हिडीओ पाहून लोक थक्क होतात पण सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेला एक डान्स व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल हा कोणता डान्स प्रकार आहे. या व्हिडीओत एक लहान मुलगा अतरंगी डान्स स्टेप्स करताना दिसत आहे.
या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की दोन मुलं भर रस्त्यावर डान्स करत आहे. त्यांच्या आजुबाजूला मुलांचा घोळका जमलेला आहे. काही जण या दोन मुलांचा डान्स व्हिडीओ शुट करत आहे तर काही जण यांचा अतंरगी डान्स पाहून पोट धरुन हसत आहे.
हेही वाचा : चिमुकलीने सांगितला सरनेमचा खरा अर्थ; ऐकून तुम्हीही हसाल पोट धरून
या व्हिडीओत डान्स करणाऱ्या दोन मुलांपैकी लहान मुलाचे हावभाव आणि अतरंगी डान्स स्टेप्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा लहानगा विचित्र असा फ्री-स्टाइल डान्स करत आहे. त्याच्याबरोबर डान्स करणारा मुलगाही त्याला आणखी प्रोत्साहन देत आहे.
stunt_immoo_ या अकाउंट वरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. डान्स पाहून अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. एका युजरने लिहिले, “हा लहान मुलगा खूप चांगला डान्सर आहे” तर एका युजरने मिश्कीलपणे लिहिले, “हे भारतीय मायकल जॅक्सन आहे.” आणखी एका युजरने लिहिले, स्ट्रीट डान्स नेहमीच इंटरेस्टींग असतो.”