Viral Video : सोशल मीडियावर शाळेच्या दिवसांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा शाळेच्या आठवणी ताज्या होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कंपासपेटीवर वेळापत्रक चिकटवले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (do you stick timetable on Compass Box during school days)

शाळा हा आठवणींचा खजिना आहे. सोशल मीडियावर जेव्हा शाळेच्या गमती-जमतीचे व्हिडीओ समोर येतात, तेव्हा हे व्हिडीओ पाहून शाळेच्या आठवणी ताज्या होतात. शाळेचे दिवस, मित्र मैत्रीणी, शिक्षक आणि प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी कायम लक्षात राहतात. तुमच्याकडे शाळेत असताना कंपास पेटी असेलच. तुम्ही कधी असे वेळापत्रक कंपासपेटीच्या एका बाजुला चिकटवले आहे का?

हेही वाचा : ही कसली आई? रडतंय म्हणून बाळाला आधी मार मार मारलं; मग तोंडात मसाला भरला, VIDEO पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल

शाळेचे वेळापत्रक कंपास पेटीमध्ये कधी असे चिकटवले का? (do you stick timetable on Compass Box )

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक फोटो दिसेल आणि या फोटोमध्ये शाळेची कंपासपेटी दाखवली आहे. कंपासपेटी उघडी आहे. एका बाजुला कंपासपेटीमध्ये सामान आहे तर कंपासपेटीच्या एका बाजुला विषयांचे वेळापत्रक चिकटवले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून शाळेची आठवण येईल तर काही लोकांना जुने दिवस आठवतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “शाळेतील एक आठवण. शाळेचं वेळापत्रक कंपास पेटीमध्ये चिकटवून ठेवायचो. शाळेत असताना कोणी कोणी केलंय असं..?”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : मुंबईकरांनो जीव एवढा स्वस्त आहे का? लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी तरुणाची धडपड, रुळावर उतरला अन्…; पाहा धक्कादायक VIDEO

kokan__wala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शाळेत असताना कोणी कोणी असं केलं.” एका युजरने लिहिलेय, “मी” तर एका युजरने लिहिलेय, “आम्ही असं नेहमी करायचो.” आणखी एका युजरने लिहिलेय, “शाळेचे वेळापत्रक कंपास पेटीमध्ये चिकटवणे, ही पण एक वेगळीच भावना होती.” यापूर्वी सुद्धा शाळेचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शाळेच्या व्हिडीओवर नेटकरी भरघोस प्रतिक्रिया देतात. व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.