आजकाल अनेक जण उबर आणि ओलाने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. कारण- रिक्षा किंवा इतर वाहनांच्या तुलनेत ओला वा उबरने प्रवास करणे थोडे सोपे असते. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा या कारची ऑनलाइन बुकिंग करता येते आणि आपला वेळही वाचतो. त्यामुळे उबर आणि ओलाचा प्रवास सुरक्षित मानला जातो. पण, आज सोशल मीडियावर काहीतरी वेगळंच पाहायला मिळालं आहे. प्रवासादरम्यान आलेल्या एका अनुभवामुळे एका महिला डॉक्टरने उबर कंपनीला चक्क ‘बॉयकॉट’ केले आहे.
दिल्लीतील डॉक्टर रुचिकानने उबर कॅबमध्ये प्रवास करताना अनुभवलेला दुःखदायक प्रसंग सांगितला. या डॉक्टर महिलेनं एक्स (ट्विटर) @theindiangirl__ अकाउंटवरून पोस्ट शेअर करीत सांगितले की, ती तिच्या घरापासून जवळच्या मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास करीत होती. पण, ड्रायव्हरच्या विचित्र ड्रायव्हिंगमुळे त्यांच्या कॅबला अपघात झाला. ड्रायव्हरने कोणत्याही इंडिकेटरशिवाय यू-टर्न घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे झालेल्या अपघातात त्या महिलेला दुखापत झाली. महिलेने तिच्या जखमी हाताचे छायाचित्रदेखील पोस्ट केले आहे. एकदा पाहाच ही पोस्ट.
हेही वाचा…कर्करोगाशी झुंज देणारी चिमुकली जेव्हा कुटुंबाला भेटते; भाऊ-बहिणीला अश्रू अनावर, पाहा VIDEO
पोस्ट नक्की बघा…
या अपघातामुळे डॉक्टर महिलेला लेक्चरसाठी कार्यालयात जाता आले नाही याची खंत तर तिने व्यक्त केलीच. पण, या डॉक्टर महिलेने ड्रायव्हरकडे परवाना नसल्याकडेही लक्ष वेधले आणि त्याची पडताळणी करण्यासही सांगितले आहे. ही पोस्ट पाहताच उबर कंपनीनेदेखील प्रतिक्रिया दिली आहे आणि पोस्टवर कमेंट करीत, “कृपया तुम्ही जिथून राईड बुक केली होती, तेथील लोकेशन आम्हाला डायरेक्ट मेसेज (DM) करून कळवा. आमची सुरक्षा टीम लवकरच तुमच्या संपर्कात असेल”, असे लिहिले आहे.
तसेच ही पोस्ट शेअर करताना या डॉक्टर महिलेने @Uber_India ला टॅग करत कंपनीला बॉयकॉट करते आहे. असे लिहिले आहे. कारण- ड्रायव्हिंग लायसन्स नसलेले किंवा अनुभव नसलेले वाहनचालक प्रवाशांची काळजी न घेता बेजबाबदारपणे गाडी चालवतात. परवान्याशिवाय वाहन चालवायला देऊच नका. कारण- त्यामुळे सर्व ग्राहकांसाठी ही एक चिंतेची किंवा असुरक्षिततेची बाब ठरते आहे, अशी कॅप्शन लिहून संबंधित महिलेने संपूर्ण घटना पोस्टमध्ये लिहून शेअर केली आहे; जी सध्या समाजमाध्यमावर चर्चेचा विषय ठरते आहे.