सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सीरियलचा सीन दाखवण्यात आला आहे. या सीनमध्ये असं काही घडतंय की तुम्हीही डोक्याला हात लावाल.. शोच्या या सीनमध्ये जे लॉजिक दाखवण्यात आलंय ते पाहून हसावं की रडावं हा प्रश्न पडतो. भारतातील टीव्ही मालिकेत काहीही घडू शकतं. एक वर्षापूर्वी मृत पावलेला व्यक्ती पुर्नजन्म घेऊन घरी एन्ट्री पासून ते शेवटची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून आत्मा बनण्यापर्यंत, काहीही घडू शकतं. साथ निभाना साथिया’ या प्रसिद्ध टिव्ही मालिकेचा एक सीन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या सीनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. हा सीन तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल.

सर्वांची लाडकी गोपी बहू आणि कोकिलाबेन यांच्या ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतला हा सीन प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक महिला डॉक्टर दिसून येतेय. नेटकऱ्यांनी या सीनमधल्या महिला डॉक्टरलाच आपलं टार्गेट बनवून सोशल मीडियावर वेगवेगळ्या मीम्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. सोबत मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात येतंय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला डॉक्टर गोपी बहूच्या कुटूंबातील एका सदस्याचं चेकअप करण्यासाठी आलेली असते. यावेळी ती ब्लड प्रेशरच्या मशीनने तपासणी करताना दिसून येतेय. तपासणी करून झाल्यानंतर ही महिला डॉक्टर सांगते, “सदस्याची शुगर लेव्हल कमी झाली आहे. म्हणून त्यांना चक्कर आली होती.”. मग काय हे ऐकून नेटकऱ्यांना हसू आवरणं अवघड झालं आहे. हा व्हिडीओ शेअर करून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या मीम्स शेअर केल्या आहेत. यामधून लोक या महिला डॉक्टरवर वेगवेगळे विनोद शेअर करताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : नवरीला सरप्राईज देण्याच्या नादात नवरदेवाने केलं असं काही की पाहतच राहिले लोक, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा काही मजेदार मीम्स:

आणखी वाचा : इवल्याश्या कासवांनी या VIRAL VIDEO तून दिला आयुष्यातला सर्वात मोठा धडा

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यूजर्सनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी सांगितले की, “या डॉक्टरने भान गमावले आहे. बाय द वे, अशी शुगर चेक करताना तुम्ही कधी पाहिलंय का?” काहींनी टीव्ही मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या अशा अवास्तव गोष्टींवर टिकासत्र देखील सुरू केलंय. असं म्हटलं जातंय की ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेची ‘गोपी बहू’ म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जी लवकरच पुन्हा एकदा ‘साथ निभाना साथिया २’ मध्ये दिसणार आहे. तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना ही माहिती दिलीय.

Story img Loader