रुग्णालयातल्या शस्त्रक्रिया विभागात एखादा रुग्ण दाखल झाल्यानंतर तिथली परिस्थिती किती नाजूक असते हे समजण्याइतका प्रत्येक डॉक्टर आणि नर्स सुज्ञ असतात. अत्यंत नाजूक स्थितीत काहीही होऊ शकते. एखाद्याचे प्राण जाऊ शकतात किंवा एखाद्याला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आणण्यासाठी डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत असतो त्यामुळे सेकंदा सेकंदाचे महत्त्व आणि प्रसंगाचे गांभिर्य याचे भान डॉक्टरांना असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून या डॉक्टरांनी आपली सगळी लाज शरम विकून खाल्ली की काय असा प्रश्न समोर उभा राहून चीड येईल. कोलंबियातल्या एका रुग्णालयातला हा व्हिडिओ आहे. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्ण विवस्त्र झोपला होता. त्याच्या भोवती रुग्णालयातले नर्स आणि डॉक्टर नाचत होते, त्याला चिडवत होते. आपल्या व्यवसायाचे सर्व नियम आणि तत्वे धाब्यावर बसवून माणुसकीला लाजवेल असा प्रकार ते करत होते. ‘डेली मेल’ या इंग्रजी वृत्तपत्राने हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर मोठ्या प्रमाण त्यांच्यावर टीका करण्यात आली असंवेदनशील वागण्याबद्दल नेटीझन्सने त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली असून या प्रकरणात असलेल्या सगळ्यांना तत्त्व पायदळी तुडवल्याबद्दल सेवेतून बेदखल करण्यात आले आहे.