Doctor Vaccination Trick Video Viral : माणसांच्या निरोगी आरोग्यासाठी लसीकरण हे खूप महत्वाचं घटक आहे. परंतु, इंजेक्शन घेतानाची भीती काय असते, याचा अनुभव बालपणाता प्रत्येकाला आलाच असेल. परंतु, एका व्हायरल व्हिडीओनं इंटरनेटवर तमाम नेटकऱ्यांनी मनं जिंकली आहेत. कारण लहान बाळाला इंजेक्शन देतान रडू येऊ नये, यासाठी एका डॉक्टरने भन्नाट शक्कल लढवली. लसीकरण करत असताना दोन लहान बाळ रडण्याऐवजी खुदकन हसू लागले. कारण डॉक्टरने एका जबरदस्त ट्रिकच्या माध्यमातून लहान मुलांचं मनोरंजन केलं आणि लस उत्तम प्रकारे टोचली. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी डॉक्टरचं कौतुक केलं आहे.
लहान मुलांचा हा सुंदर व्हिडीओ डॉ. इम्रान पटेल यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, लहान मुलांना लस देताना डॉ मजेशीर पद्धतीने गाणं बोलून त्यांचं मनोरंजन करतात. त्यामुळे इंजेक्शन घेताना बाळ रडण्याऐवजी हसत राहतं. हे मनमोहक दृश्य पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे. कारण इंजेक्शन देत असतान लहान मुलं खूप रडतात. पण या डॉक्टरच्या जबरदस्त ट्रिकमुळे या मुलांना हसू आलं आणि लसीकरणाला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
नक्की वाचा – Viral Video : वाघाशी मस्ती करायला गेला अन् जबड्यातच सापडला, व्हिडीओ पाहून थरकाप उडेल
इथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, डॉक्टर तुमची टेक्निक खूप अप्रतिम आहे. जेव्हा लहान मुलांना लस द्यायची असते, तेव्हा प्रत्येक डॉक्टरांनी लहान मुलांचं अशाच प्रकारे मनोरंजन केलं पाहिजे. अन्य एका यूजरने म्हटलं, लहान मुलांना खेळवण्याची एक चांगली ट्रिक. डॉक्टरचा हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून यूजर्स त्यांच्या ट्रिकचं कौतुकही करत आहेत.