अनेक लोक डॉक्टरांना देव मानतात कारण मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या व्यक्तीलाही जीवदान देण्याची कौशल्य त्यांच्याकडे असते. रुग्णांचे प्राण वाचवणे आणि त्यावर वेळीच योग्य उपचार करणे हे डॉक्टरांचे कर्तव्य असते. अशाच एका डॉक्टराचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. विजयवाडा येथील अयप्पा नगर येथे एका आंध्रातील डॉक्टरांच्या प्रसंगवधान राखत केलेल्या एका कृतीमुळे एका सहा वर्षांच्या मुलाचे प्राण वाचले आहे. मुलाचे पालक त्याला रस्त्याने घेऊन जात असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला.. जवळून जात असलेल्या डॉ. रवालिकाला याना मुलाला होत असलेला त्रास लक्षात आला आणि योग्य त्वरीत उपचार करण्यास सुरू केले. तिने रस्त्यावरच त्या मुलावर CPR (कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन) केले.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, डॉक्टर सतत मुलाच्या छातीवर थोपटत आहे आणि तो निर्जीव पडला होता, त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे. एक व्यक्ती त्याला तोंडावाटे श्वास देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अनेक प्रयत्नांनंतर, डॉक्टरांनी ६ वर्षांच्या मुलाला यशस्वीरित्या जिवंत केले. पाच मिनिटांच्या तणावानंतर, मुलगा पुन्हा श्वास घेऊ लागला. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यानंतर तो पूर्णपणे बरा झाला आहे.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
What is Schizophrenia Disorder| Schizophrenia symptoms Treatment in Marathi
Schizophrenia: स्किझोफ्रेनियाग्रस्त आईने केली मुलाची हत्या; काय आहे हा विकार?
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल

हेही वाचा – तळ्याकाठी पाणी पीत होता हत्ती, पाण्यात लपलेल्या मगरीने अचानक केला हल्ला, जबड्यात पकडली सोंड अन्…थरारक Viral Video

हेही वाचा – तळ्याकाठी पाणी पीत होता हत्ती, पाण्यात लपलेल्या मगरीने अचानक केला हल्ला, जबड्यात पकडली सोंड अन्…थरारक Viral Video

Sudhakar Udumula नावाच्या खात्यावरून एक्सवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये मुलाला इलेक्ट्रिक शॉक लागल्याचे सांगण्यात आले आहे. या पोस्टमध्ये मुलाचा आणखी एक व्हिडीओ दिसत आहे ज्यामध्ये मुलगा ठणठणीत बरा झालेला असून आपल्या घरी असल्याचे दिसत आहे. व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून डॉ. रावलिकाच्या तत्परतेमुळे आणि सतर्क कृतींमुळे लोकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एकाने लिहिले की, “हे प्रभु, माझ्या दिवसाचा शेवट करण्यासाठी किती सुंदर व्हिडिओ आहे. या बाईला अधिक शक्ती देवो!” दुसऱ्याने लिहिले की, “डॉक्टरांचे अभिनंदन. माझा प्रबंध इलेक्ट्रिक बर्नवर होता आणि हॉस्पिटलच्या बाहेर CPR वापरून पुनरुज्जीवनाचा यशाचा दर १०% पेक्षा कमी आहे त्यामुळे हे प्रकरण आणखी उल्लेखनीय ठरते.” तिसऱ्याने लिहिले की, ती एक देवी आहे. श्वास थांबण्याचे कारण काय होते? मला आशा आहे की, मुलाबरोबर ते पुन्हा होणार नाही?”

Story img Loader