Virat Kohli AI Photos: विराट कोहलीचे आज लाखो चाहते आहेत. त्याने क्रिकेटच्या मैदानात चौकार-षटकार मारून विरोधी संघाला मात देताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. त्याच्या बॅटींगचे कौशल्य काय आहे हे साऱ्या जगाला माहित आहे. पण तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे का की, जर विराट क्रिकेटर नसता तर? जर तो इतर क्षेत्रात असता तर कसा दिसला असता? तुम्ही असा विचार कधीही केला नसेल याची आम्हाला खात्री आहे. ही प्रत्यक्षात अशक्य असलेली कल्पना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने शक्य करून दाखवली आहे. सध्या कित्येक आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सच्या फोटोमध्ये एडिटिंग टूलच्या मदतीने असे अविश्वसनीय फोटो तयार केले आहे जे खऱ्या आयुष्यात अशक्य आहेत.आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने एका आर्टिसने विराट कोहली वेगवेगळ्य़ा प्रोफेशनच्या गेटअपमध्ये कसा दिसेल हे दर्शवले आहे जे पाहून यूजर्स देखील थक्क झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा