डॉक्टरांच्या अक्षराद्दल अनेक विनोद केले जातात. लहानपणी एखाद्याचे अक्षर खराब असेल तर तू पुढे मोठा होऊन डॉक्टर होशील अशी देखील लहान मुलांची गंमत करतात. डॉक्टरांच्या अनाकलनीय अक्षरामुळे जगभरात अनेक लोकांचे प्राण जात असल्याची माहिती समोर आली आहे.

जगभरात दरवर्षी एकूण सात हजार लोक डॉक्टरांच्या खराब अक्षरामुळे दगावतात.  केमिस्ट लोकांना त्यांचे अक्षर न कळल्यामुळे ते चुकीची औषधे देतात आणि त्यातून हे बळी जातात असा एक अहवाल समोर आला आहे.

हे प्रमाण खूप मोठे आहे. डॉक्टर लोक हे सर्वात हुषार लोकांपैकी एक समजले जातात तर त्यांचे अक्षर घाणेरडे का असते असा एक प्रश्न नेहमीच पडतो. त्याचे उत्तर एका कोरा पोस्टच्या माध्यमातून डॉक्टर आरुषी शर्मा यांनी दिले आहे.

Story img Loader