Doctors removed 16 inch bottle gourd from mans rectum: गेल्या काही वर्षांत शरीरात एखादी वस्तू अडकल्याच्या अनेक केसेस जगभरातील डॉक्टरांना पाहायला मिळाल्या आहेत. अनेकदा लहान मुलं अनावधानेने काहीतरी खातात किंवा कानात, नाकात काही वस्तू टाकतात आणि त्या काढता काढता पालकांच्या नाकी नऊ येतात, अनेकदा काही गंभीर घटनांमध्ये शेवटी ऑपरेशन हाच पर्याय उरतो. लहान मुलांच्या अशाप्रकारच्या घटना आपण अनेकदा ऐकतो, पण आता अशी एक घटना समोर आलीय, ज्याबद्दल वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

मध्य प्रदेशातील ६० वर्षीय व्यक्तीच्या गुदाशयातून १६ इंचाचा दुधी भोपळा (bottle gourd) काढल्याची माहिती अलीकडेच एका डॉक्टरांनी दिली आहे, यामुळे हे प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे.

हेही वाचा… Viral Video: पॉवर ऑफ मेकअप! वयोवृद्ध महिलेचं अवघ्या सेकंदात बदलेलं रूप पाहून तुम्हीही व्हाल शॉक

नेमका प्रकार काय घडला? (Doctors removed 16 inch bottle gourd from mans rectum)

टाईम्स ऑफ इंडिया (TOI) नुसार, ६० वर्षीय शेतकरी पोटदुखीची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे आला. त्यामुळे डॉक्टरांनी एक्स-रे केले, ज्यामध्ये त्याच्या गुदाशयात दुधी असल्याचे दिसून आले. दुधी त्याच्या गुदाशयात कशी गेली याचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे. तसेच त्या व्यक्तीने यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

हेही वाचा… Spiderman बनून चालत्या गाडीवर स्टंट करण पडलं महागात; पोलिसांनी पडकलं अन्…, पाहा नक्की काय घडलं!

त्या ६० वर्षीय व्यक्तीला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि अखेर दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांना ती दुधी काढण्यात यश आले. ऑपरेशन करणाऱ्या टीममध्ये छतरपूर जिल्हा रुग्णालयाचे डॉ. मनोज चौधरी, डॉ. नंदकिशोर जाटव, डॉ. आशीष शुक्ला आणि डॉ. संजय मौर्य यांचा समावेश होता. प्राथमिक तपासणीनंतर त्या व्यक्तीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी सांगितले की तो माणूस धोक्याबाहेर आहे आणि आता बरा झाला आहे.

हेही वाचा… Lizard Found Inside Amazon Parcel: धक्कादायक! ॲमेझॉनवरून केली ऑर्डर अन् बॉक्स उघडताच सापडला जिवंत सरडा; फोटो पाहून थरकाप उडेल

डॉ. चौधरी यांनी TOI ला सांगितले की, या घटनेमागील कारण मानसिक आजार, टेस्टिक्युलर डिसऑर्डर (testicular disorder) किंवा चुकून घडलेल्या अपघाताशी संबंधित असू शकते. या घटनेची नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी रुग्णालयाने तपास सुरू केला आहे.