परिस्थितीला कारण न बनवता सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर यश हमखास मिळतं. अशी कित्येक उदाहरणं आपण याआधी एकली असतील. यश हे पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात मिळत नाही त्याला सातत्यानं प्रयत्न करावे लागतात. अशीच एक कहाणी आहे दिलखूष कुमार यांची. बिहारच्या सहरसा जिल्ह्यातल्या रिक्षाचालकाची ही कहाणी आहे.एक वेळ पोट भरण्यासाठी रिक्षा चालवण्याचंही काम केलेल्या दिलखुश कुमार याची आता स्वतःची कॅब कंपनी आहे. या कंपनीद्वारे जवळपास 4 हजार गाड्या रस्त्यांवर धावत आहेत. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर दिलखुश कुमार याने स्वतःची स्टार्टअप कंपनी स्थापन केलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंटरव्यूहमध्ये iPhone न ओळखल्यामुळे नोकरी –

१० वर्षांपूर्वी नोकरीची नितांत गरज असलेल्या दिलखूश कुमार यांनी पाटण्याच्या एका कंपनीमध्ये अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना इंटरव्यूहसाठी बोलावले. मात्र एका प्रश्नाचं उत्तर देता न आल्यामुळे त्यांना नोकरी नाकारली गेली. त्यांना इंटरव्यूहमध्ये आय फोन दाखवत परिक्षकांनी या मोबाईलच्या कंपनीच नाव काय असं विचारलं होतं. मात्र दिलखूश कुमार पहिल्यांदा हा मोबाईल पाहत असल्यानं त्यांना ते सांगता आलं नाही. त्यानंतर ते गावी परतल आले आणि वडिलांसोबत ड्रायव्हरचे काम करू लागले. त्यावेळी ज्या पद्धतीने त्या साहेबांनी आयफोन दाखवला ते सतत माझ्याडोळ्यासमोर फिरत असत असं ते सांगतात. मात्र जेव्हा माझ्याकडे आयफोन आला तेव्हापासून ते काही मला आठवत नाही.

Aryagoची सुरूवात

आज दिलखूष यांची स्वत:ची कंपनी  आहे. ते मुंबई आणि दिल्लीतील ओला-ऊबेरप्रमाणेच सेवा पुरवत आहेत. दिलखूष यांनी आपल्या गावापासून कंपनीची सुरूवात केली. तिचे नाव Aryago असे आहे. कंपनीची सुरूवात त्यांनी २०१६मध्ये केली होती. त्यांच्यामुळे इतरांनादेखील प्रेरणा मिळते आहे. जर त्या दिवशी त्यांना ती नोकरी मिळाली असती तर आयुष्यभर ते एक सर्वसामान्य कर्मचारी बनून राहिले असते. मात्र आज दिलखूष कुमार एका कंपनीचे मालक आहेत आणि इतरांनादेखील रोजगार पुरवत आहेत. राजधानी पाटणाच्या रस्त्यांवर धावणाऱ्या ३२०० कॅब आता दिलखुश कुमारच्या कंपनीशी जोडल्या गेल्या आहेत. २०२३च्या अखेरीपर्यंत २५ हजार गाड्या समाविष्ट करण्याचा त्याचा संकल्प आहे.