एका लहान मुलीचं घरात असलेल्या पाळीव कुत्र्यासोबतचं बॉण्डिंग पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कुत्र्याने जर आपल्यासोबत घट्ट मैत्री केली, तर तुम्हाला संकटकाळी कसलाही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. कारण आपल्यासोबत असलेली मैत्री कुत्रा प्रामाणिकपणे निभावत असतो. अशाच प्रकारचा एक जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुत्र्याने एका लहान मुलीला वडील घरी येत असल्याचं इशारा केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे कुत्र्याची आणि त्या मुलीची असेलेली घट्ट मैत्री अनेकांचा लक्ष वेधून घेत आहे.
नेमकं काय घडलं?
एक लहान मुलगी टीव्ही ऑन करुन घरातील हॉलमध्ये बसलेली असते. त्याचवेळी तिचे वडील घरी येत असल्याचं पाळीव कुत्र्याला समजतं. त्यानंतर कुत्रा तातडीनं त्या चिमुकलीला इशारा करुन टीव्ही बंद करण्यासाठी सांगतो. मुलीलाही कुत्र्यावर पूर्ण विश्वास असल्याने ती लगेच टीव्ही बंद करते आणि अभ्यास करायला सुरुवात करते. हे सुंदर दृष्य कॅमेरात कैद झाले असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कुत्र्यामध्ये आणि लहान मुलीमध्ये असलेलं सुंदर बॉण्डिंग पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
@yoda4ever नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून पॉटनर्स इन क्राईम असं कॅप्शनही दिलं आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर गाजला असून ५ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. “लहान मुलांप्रणाणे कुत्र्यांच्याही बुद्धीला चालना मिळत असते.” असं एका नेटकऱ्याने म्हटलं. तर दुसरा नेटकरी प्रतिक्रिया देत म्हणाला, “जर्मन शेफर्ड कधीच तुमची फजीती होऊ देणार नाही.” कुत्र्यान मोठ्या चालाखीने मुलीला टीव्ही बंद करायला सांगितलं. कारण काही क्षणातच तिचे वडील घरी पोहेचत असल्याचं त्या कुत्र्याला कळलेलं असतं. कुत्र्याने सावध केल्यानंतर त्या मुलीनेही त्याच्यावर विश्वास ठेऊन टीव्ही बंद केला आणि अभ्यास करायला सुरुवात केली. हा सुंदर व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांची मनं जिंकत आहे.