Dog bite Viral video: सोशल मीडियावरील काही व्हिडीओ हे खूपच धक्कादायक असतात. एक असाच धक्कादाय व्हिडीओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर ट्रेंड होऊ लागला आहे. आपल्या आजूबाजूला तुम्ही अनेक पाळीव कुत्रे पाहिले असतील. हे कुत्रे तसे पाहाता खूप शांत स्वभावाचे असतात. तसेच कुत्र्याला एक मनमिळावू आणि प्रेमळ प्राणी म्हणून ओळखले जाते. परंतू नोएडा येथे एका पाळीव कुत्र्याने असं काही केलं आहे, जे पाहून तुम्हाला कुत्र्यांची भीतीच वाटू लागेल. दिल्लीतून एक व्हिडीओ समोर आला आहे, यामध्ये लिफ्टचा दरवाजा उघडताच कुत्र्यानं चिमुकलीवर हल्ला केला आणि मुलगी वेदनेने तिथेच कळवळत राहिली. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
दिल्लीतील नोएडामध्ये सेक्टर १०७ रहिवाशी इमारतीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याने चिमुकलीवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये लिफ्टमधील एका मुलीवर पाळीव कुत्र्याने हल्ला केल्याचे दिसत आहे. लिफ्ट एका मजल्यावर काही सेकंदांसाठी उघडते, लिफ्ट उघडताच कुत्र्याने मुलीवर उडी मारली आणि तिच्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर ती वेदनेने कळवळत हाताच्या दंडाकडे बघत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
आश्चर्याची गोष्ट अशी की कुत्र्याचा मालक असा काही वागत होता की, जसे काही त्याच्या कुत्र्याने काही केलेच नाही. ही लहान मुलगी वेदनेनं ओरडत होती. परंतू या व्यक्तीने कुत्र्याला फक्त लिफ्टबाहेर काढलं आणि निघून गेला. हा व्हिडीओ पाहून नेटीझन्स खूप संतापले आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Loksabha election: हे कसं झालं शक्य? लोकसभा निवडणुकीदरम्यान अवघ्या १० वर्षांच्या मुलांनी केलं मतदान; VIDEO व्हायरल
कुत्रा चावल्यानंतर या मालकाला त्या मुलीची साधी चौकशी सुद्धा करावीशी वाटली नाही, हे पाहून नेटकरी मात्र पुरते संतापले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक कुत्र्याच्या मालकावर जोरदार टिका करताना दिसत आहेत. कुत्र्याच्या मालकावर कडक कारवाई करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. एका यूजरने लिहिले की, तो व्यक्ती मुलीच्या जवळही गेला नाही. कोणी इतकं क्रूर कसं असू शकतं.
उच्चभ्रू सोसायटीत अनेकांना वेगवेगळ्या जातींची कुत्रे पाळण्याचा छंद असतो. त्यात विदेशी जातींची कुत्रे देखील असतात. कुत्री सांभाळत असताना किंवा पाळत असताना शेजारच्यांना किंवा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असं कायम सांगण्यात येतं. मात्र या नियमाचं पालक होताना दिसत नाही. संध्याकाळी अनेक लोक आपले कुत्रे बाहेर फिरायला घेऊन जातात. मात्र यावेळी नागरिकांना या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. आतापर्यंत अनेक शहरात अशा कुत्रा चावल्याच्या घटना घडल्या आहेत.