पाळीव प्राणी आणि पक्षी म्हटलं काही जणांचं जीव की प्राण असतो. त्यामुळे अनेकांच्या घरात एकापेक्षा जास्त पाळीव प्राणी पक्षी पाहायला मिळतात. पण अनेकदा मालकाचं एकाप्रती असलेलं जास्त प्रेम पाहून प्राण्यांमध्ये जळकी वृत्ती तयार होते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पोपट आणि कुत्रा यांच्यात जुंपल्याचं दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या कळेल की मालकीण पोपटाचे लाड करताना दिसत आहे. पोपट तिच्या हातावर बसला आहे आणि ती पोपटासोबत गप्पा मारत आहे. यावेळी ती पोपटाला गोंजारते आणि पोपट तिला किस देखील करतो. तिचं पोपटाप्रती असलेलं प्रेम पाहून कुत्र्याला राग अनावर होतो.
व्हायरल व्हिडीओत पोपटाचे लाड होत असताना कुत्रा बेडवरून उठतो आणि पोपटाला पायाने ढकलतो. कुत्र्याने लाथ मारल्यानंतर पोपट ओरडताना दिसत आहे. कुत्र्याच्या अशा वागण्याने मालकिणीला राग येतो आणि ती त्याला ओरडते. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. तसेच मजेशीर कमेंट्स करत आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, कुत्र्याने हे काही बरोबर केलं नाही. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, पोपटाचं पुढे काही खरं नाही. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.