Shocking video viral: गेल्या काही दिवसांमध्ये कुत्र्याने आपल्या मालकांवर किंवा अनोळखी व्यक्तींवर हल्ला केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. भटक्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला केल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल किंवा तसे व्हिडीओही पाहिले असतील. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. भटकी कुत्री अनेकदा लहान मुलांवर हल्ला करतात. आपण पाहिलं असेल की, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात; ज्यांना प्राणी खूप आवडतात. रस्त्यावरही एखादा कुत्रा, मांजर दिसलं की, हे लोक लगेच त्यांना जवळ जाऊन गोंजारतात, खाऊ घालतात. मात्र, हेच करणं एका महिलेला खूप महागात पडलं आहे. तिनं हात लावताच कुत्रा आक्रमक झाला आणि त्यानं महिलेच्या चेहऱ्याचे अक्षरशः लचके तोडले. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन महिला रस्त्याने जात असताना, एक कुत्रा रस्त्याच्या कडेला बसला आहे. या कुत्र्याला पाहून या महिला त्याच्या जवळ जातात आणि त्याला गोंजारू लागतात. त्याच वेळी अचानक हा कुत्रा आक्रमक होऊन, दोघींपैकी एकीवर जोरदार हल्ला करतो आणि तिच्या चेहऱ्याचे लचके तोडतो. त्याला आजूबाजूचे लोक मारण्याचा प्रयत्न करतात, महिलेला वाचवण्यासाठी अनेक लोक पुढेही येतात; मात्र हा कुत्रा महिलेवर हल्ला करताना मागे हटत नाही. काही वेळाने हा कुत्रा पळून जातो. मात्र, ती महिला मोठ्याने आक्रोश करताना दिसत आहे. त्यानंतर या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> गावाकडच्या आजीबाई पहिल्यांदाच एस्केलेटरवर गेल्या अन् कोसळल्या; लोक पाहत राहिले…VIDEO पाहून येईल संताप

सोशल मीडियावर या घटनेच्या सीसीटीव्हीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक संताप व्यक्त करीत आहेत. भटक्या कुत्र्यांची वाढती समस्या सोडविण्याची मागणी लोकांनी केली आहे. हा व्हिडीओ soul_singing_list या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळाले असून, नेटकरीही यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dog attacked on face of a woman shocking video goes viral srk