Viral video: पिटबुल हा जगातील सर्वात धोकादायक प्रजातीचा कुत्रा मानला जातो आहे. ही प्रजात त्याच्या अत्यंत आक्रमक वृत्तीसाठी देखील ओळखली जाते. पिटबुल हे इतर कुत्र्यांपेक्षा जास्त हिंस्र आणि अनियंत्रित असतात, ते रागावल्यावर थेट हल्ला करतात. हे हल्ले जीवघेणे असतात. पिटबुलच्या हल्ल्यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. बिबट्या हा देखील जंगलातील अत्यंत खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जातो. आता विचार करा जर बिबट्या आणि कुत्रा समोरा-समोर आले तर काय होईल. तुम्ही म्हणाल बिबट्या कुत्र्याची सहज शिकार करेल..पण हाच तुमचा समज खोटा ठरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता तुम्हीच पाहा बिबट्या आणि कुत्रा समोरा-समोर आल्यावर नेमकं काय झालं. हे दोघे आमने-सामने आल्यावर शेवटी कोण जिंकलं तुम्हीच पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिबट्यानं कुत्र्यावर झडप घातली तर कुत्र्याचं काय होईल, हे वेगळं सांगायची गरज नाही. कुत्र्याचा फडशा पाडणारे बिबटे तुम्ही अनेक पाहिले असतील. पण बिबट्याच्या तावडीतून एका कुत्र्यानं स्वतःला आश्चर्यकारकरीत्या वाचवलंय. ही थरारक आणि चकीत करणारी घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तो आला दबक्या पावलांनी आला खरा पण शेवटी कुत्र्याने बिबट्याला तेथून धूम ठोकण्यास भाग पाडले. सुरुवातीला बिबट्या आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा अंदाज घेताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही घटना जयपूरमध्ये घडली आहे. त्याचं झालं असं की, पहाटे चारच्या सुमारास एक बिबट्या शिकार करण्याच्या उद्देशानं गावात शिरला होता. तेवढ्यात त्याला घरासमोर बसलेला एक कुत्रा दिसला. सुरुवातीला बिबट्या आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा अंदाज घेताना दिसत आहे. यानंतर बिबट्या हळू हळू पुढे येऊ लागला. मात्र, क्षणात कुत्र्याला भनक लागते आणि कुत्र्याचा प्रतिहल्ला बिबट्याला भारी पडतो. पिटबुल कुत्र्यानं अक्षरश: बिबट्याला फाडलं आहे. कुत्र्याचा असा प्रतिहल्ला पाहून बिबट्याने पळ काढला असून हा हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ‘शिकार करो या शिकार बनो’ स्वत:च्या अस्तित्वासाठी जंगलाच्या दोन वाघांची झुंज; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

हर कुत्ता अपनी गली में शेर होता है

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @BhawaniSinghjpr नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “म्हणून कुणालाच कमी समजू नका.” तर आणखी एकानं “अशाप्रकारे हर कुत्ता अपनी गली में शेर होता है, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.” त्यात हा तर पिटबुल जातीचा कुत्रा असल्यानं तो बिबट्यावर चांगलाच भारी पडला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dog beat leopard in the jungle fight animal shocking video goes viral on social media srk