माणूस असो वा प्राणी, निसर्गाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट इतरांपेक्षा काहीतरी वेगळंपण घेऊन आले आहेत. प्रत्येकामध्ये काही खास कौशल्य, कलागुण दडलेले आहेत. याशिवाय रोजच्या जीवनातही आपण अनेक गोष्टी शिकत असतो. पण, त्या चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी तुमच्याकडे केवळ दृष्टीच नाही, तर उत्तम दृष्टिकोनही आवश्यक आहे. नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो एका अधिकाऱ्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात एक श्वान लाडकी शिडीवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.

आयुष्यात फक्त समतोल गरजेचा

हा व्हिडीओ झारखंड प्रशासकीय सेवेचे अधिकारी संजय कुमार यांनी त्यांच्या @dc_sanjay_jas एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘#समतोल: जर तुम्ही आयुष्यात समतोल ठेवला तर तुम्ही निश्चितपणे पुढे जाऊ शकता, अन्यथा खाली पडायला वेळ लागत नाही… आयुष्यात फक्त समतोल महत्वाचा आहे…’ या व्हिडीओमध्ये एक श्वान लाकडी शिडीवर चढताना दिसत आहे. ज्याप्रकारे त्याने शिडीवर चढण्यासाठी समतोल ठेवला आहे, त्याप्रकारे आयुष्य जगतानाही असा समतोल राखता आला पाहिजे, असा मेसेज त्यांनी यातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Lion Cub Learns Why You Dont Bite On Dads Tail funny Animal Video goes Viral on social media
VIDEO: शेवटी बाप बाप असतो! झोपलेल्या सिंहाची पिल्लानं चावली शेपटी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Shocking video of girl heart attack during dance on stage video goes viral on social media
“मरण कधी येईल सांगता येत नाही” डान्स करताना स्टेजवर कोसळली ती पुन्हा उठलीच नाही; नेमकं काय घडलं? VIDEO आला समोर
Paaru
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट

श्वानांना त्यांच्या पायाच्या प्रकारामुळे लाकडी शिडीवर चढणे फार अवघड असते. परंतु, असे असतानाही हा श्वान अनेक अडचणींना तोंड देत शिडी चढत आहे. व्हिडीओमध्ये पुढे दाखवण्यात आले आहे की, त्याच्या बरोबरचा एक श्वान आधीच टेरेसवर जाऊन उभा आहे, त्याला पाहून खाली असलेला श्वानही वर जाण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडीओमध्ये श्वान एकावेळी एक पाऊल पुढे टाकत वर चढण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी हे अवघड असले तरी तो प्रयत्न करणे काही सोडत नाही. याचप्रकारे तुमची आयुष्यात प्रयत्न करण्याची इच्छा असेल तर यशाची शिडी चढण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही, हे शिकवणारा हा व्हिडीओ आहे.

हा व्हिडीओ खूप पाहिला जात आहे आणि खूप पसंत केला जात आहे. व्हिडीओ पाहणारे लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘सर, प्रत्येक क्षेत्रात समतोल खूप महत्वाचा आहे.’ तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, सर, प्रयत्न करणाऱ्यांना कधीच अपयश येत नाही.

Story img Loader