Dog Viral Video: समाजमाध्यमांवर सतत विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये बऱ्याचदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात आपण पाहतो. या व्हिडीओंमधील कधी काही हिंस्त्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात; तर कधी प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो व्ह्यूज मिळवतात. दरम्यान, आता एका श्वानाचा असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, ज्यात तो असं काहीतरी करतोय जे पाहून नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत.

माणसांप्रमाणेच प्राणीदेखील विविध गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आपण जसे खेळतो, तसेच प्राणीदेखील एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे असे गमतीशीर व्हिडीओ खूप व्हायरल होतात. मागील काही महिन्यांपूर्वी असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यात श्वान घरातील सदस्यांबरोबर खेळताना दिसले होते; तर कधी घरातील मुख्य सदस्याला घाबरून रूसलेले दिसले होते. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक श्वान चक्क डान्स करताना दिसत आहे.

Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क

खरं तर श्वान हा अनेकांचा आवडता प्राणी आहे, त्यामुळे घरात श्वानाला इतर सदस्यांप्रमाणेच वागणून दिली जाते. आवडीचा खाऊ दिला जातो, फिरायला नेलं जातं. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील श्वानाला त्याचा मालक चक्क डीजेवर नाचण्यासाठी घेऊन गेल्याचे दिसत आहे. यावेळी मालक श्वानाला आपल्या खांद्यावर घेऊन आणि त्याचे पुढचे दोन्ही पाय पकडून त्याला नाचवतो. श्वानाला नाचताना पाहून आसपासचे इतर लोकही खूप खूश होतात.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @top_sound_system_in_sangli या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत सहा लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ४८ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “अरे व्वा… यालापण आवड आहे नाचायची”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूपच हुशार दिसतोय.” तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “बस आता उतर खाली”, तर आणखी एकाने श्वानाला नाचवल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. त्याने लिहिलेय, “बिनडोक लोक, श्वानांना आपल्यापेक्षा १० पटीने जास्त ऐकू येते, त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो.”

हेही वाचा: वाईट अंत! एकट्या जिराफाची सिंहाच्या कळपाकडून कोंडी; पुढे असे काही घडले की… Viral Video पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, यापूर्वीदेखील काही श्वानांचे अनेक गमतीशीर व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते; ज्यातील एका व्हिडीओमध्ये श्वान गणपती बाप्पाचे विसर्जन पाहून भावूक झालेला दिसतो, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये श्वान गल्लीतल्या चिमुकल्याबरोबर नाचताना दिसतो.

Story img Loader