Viral video: बहुतेक लोकांना कुत्रा आणि मांजर पाळायला आवडतात. बरेच लोक त्यांच्या घरात ससे, कासव, रंगीत मासे यासारखे प्राणी देखील ठेवतात. पण बहुतेक लोकांना कुत्रा पाळण्याची आवड असते. कुत्र्यांच्या अनेक प्रजाती आहेत. ज्यामध्ये लॅब्राडॉर, जर्मन शेफर्ड, बुलडॉग, माल्टीज, बीगल्स, हस्की इत्यादी जातीचे कुत्रे लोकांना आवडतात.सर्वात इमानदार प्राणी अशी कुत्र्याची ओळख. अनेक जण मोठ्या हौसेने कुत्रे पाळतात त्यांना जीव लावतात. आणि हळू हळू ते कुटुंबाचा एक भागच बनतात. आणि मग आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य आपल्यापासून लांब गेल्यावर जेवढं दुख: तेवढंच दुख: या प्राण्यांच्याही बाबतीत होतं. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कुत्र्यानं मालकीणीच्या हातातच जीव सोडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही हसवणारे असतात तर काही व्हिडीओ पाहून खरंच डोळ्यात पाणी येत, त्यातलाच हा एक व्हिडीओ. आपल्या जवळच्या माणसाचं कायमचं सोडून जाणं, यापेक्षा मोठं दुख: नाही. हे फक्त माणसांच्याच नाहीतर प्राण्यांच्याही बाबतीत लागू होतं. एखाद्याला जीव लावला की त्याच्याशिवाय आयुष्य कठीण वाटतं, असाच प्रकार एका महिलेसोबत घडला. तिच्या पाळीव कुत्र्यानं हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंझ देता देता तिच्या हातावरच जीव सोडला. यावेळी महिलेला अश्रू अनावर झाले, ती हंबरठा फोडून रडू लागली. आपला जवळचा व्यक्ती गेल्याचं जेवढं दुख: असतं , तेवढच दुख: तिला कुत्रा गेल्यावर झालं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> काय सांगता! शाळाच गेली विद्यार्थ्यांच्या घरी, ‘या’ शिक्षकाचा VIDEO पाहून म्हणाल शिक्षक असावा तर असा..

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर होत असून प्राणी प्रेमींनी व्हिडीओ पाहून हळहळ व्यक्त केली आहे. अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकरी करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dog death in hospital woman cried like a human had died emotional video viral on socail media srk