Dog Singing Human Chalisa Viral Video: देवावर श्रद्धा असलेल्या लोकांची कमतरता नाही. देवावर श्रद्धा असलेले लोक कुठेही असले, कोणत्याही परिस्थितीत असले तरी सैदव देवाच्या स्तोत्र किंवा चालीसा ऐकतात आणि श्रद्धेने नतमस्तक होतात. पण, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की,”प्राण्यांनाही देवाची ओढ असते”. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ याचीच प्रचिती देत आहे.

कुत्रा हा असा प्राणी आहे जो मानवीवस्तीमध्ये राहतो. अनेक लोक घरात कुत्रा पाळतात. त्याला अनेक गोष्टींचे प्रशिक्षण देतात आणि तितक्याच हुशारीने ते शिकतात. त्यांच्या या कौशल्याने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतात. एखाद्याने एकदा त्यांच्यावर जीव लावला तर ते त्यांना कधीही विसरत नाही. दरम्यान सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कुत्र्याने जे केले ते पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे..

हनुमानाचा गोंडस भक्त

इन्स्टाग्रामवर thebanjaraboy वापरकर्त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, एक जर्मन शेफर्ड कुत्रा(श्वान) जमिनीवर निवांतपणे झोपलेला दिसतो. त्याच्या जवळच भिंतीवर एक टीव्ही आहे, ज्यावर गाणी वाजत आहे. पण त्याकडे तो अजिबात लक्ष देत नाही.

एक व्यक्ती टिव्हीवर गाणी बदलत आहे. व्हिडिओमध्ये, प्रथम एक बॉलीवूड गाणे वाजत असल्याचे दिसून येते. गाणे बदलताना, तो व्यक्ती कैलाश खेरचे गाणे वाजवतो. पण, ही गाणी ऐकत असताना, कुत्रा( श्वान) जमिनीवर तसाच झोपून राहतो. नंतर तो व्यक्ती टीव्हीवर हनुमान चालीसा वाजवतो अन् पुढे जे घडते ते पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येते.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हनुमान चालिसा ऐकताच कुत्र्याने काय केले पाहा

हनुमान चालिसा ऐकताच तो निवांत झोपलेला कुत्रा(श्वान) अचानक उठून बसतो आणि आपल्या गोंडस आवाजात सुरू लावतो. त्याला पाहून असे वाटते की, तो आपल्या भाषेत हनुमान चालिसा म्हणत आहे. श्वानाची ही कृती अनेकांच्या हृदयाला स्पर्श करणारी आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी पुन्हा एकदा थक्क झाले आहे.

नेटकऱ्यांना प्रचंड आवडला व्हिडीओ

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ दहा लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये, इंटरनेट वापरकर्त्यांनी निश्चितच धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडिओवर टिप्पणी करताना, एका वापरकर्त्याने म्हटले की, ” हा शुद्ध आत्मा असलेला हा प्राणी आहे, म्हणूनच हनुमानजींनी त्याला आशीर्वाद दिला.” आणखी एका युजरने लिहिले, “हनुमान जीची त्याच्यावर कृपा आहेर.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “तो एकही सुर चुकणार नाही याची काळजी घेत आहे!” त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, “ये देख कर माझ्या डोळ्यात पाणी आले, जय श्री राम, जय बजरंगबली.”