श्वान हे मनुष्यांशी चांगली मैत्री निभवतात आणि संकट काळात मदत देखील करतात. विविध व्हिडिओमधून त्यांचा चांगुलपणा समोर आलेला आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका श्वानाने आपला उदारपणा दाखवला आहे. हा गोंडस व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

Buitengebieden नावाच्या ट्विटर युजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात एक श्वान इटुकल्या सस्यांना आणि एका डुक्कराच्या पिलाला गाजरची चव घेऊ देत आहे. श्वानाने आपल्या जबड्यांमध्ये गाजर पकडून ठेवले आहे आणि काळे, पांढरे ससे हे गाजर खाण्यासाठी पुढे सरसावत आहे. श्वानाकडून ससे आणि डुक्कराच्या पिलाला गाजराचा आस्वाद घेऊ देतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

(Viral : कमी सुविधा असेल तेव्हा.. अभिनेता पंकज त्रिपाठींचा हा सल्ला तुमचे आयुष्य बदलेल, पाहा व्हिडिओ)

व्हिडिओला ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. श्वानाचा चागुलपणा बघून नेटकऱ्यांनीही त्याचे कौतुक केले आहे. व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून त्यास ३२ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून या श्वानाची या सशांसोबत घट्ट मैत्री असेल असे वाटते.

नेटकरी म्हणाले ‘ओह माय डॉग’

सशांना आणि डुक्कराच्या पिलाला गाजर देणाऱ्या या श्वानाचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. श्वानाप्रमाणेच एक बदक आपल्या चोचीतून माशांना खाद्य देत असल्याचा व्हिडिओ एका यूजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून पक्षी प्राण्यांमध्ये देखील जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे दिसून येते. तर एकाने ओह माय डॉग असे लिहून आश्चर्य व्यक्त केला आहे.

Story img Loader