गुजरातमधील गीर अभयारण्यात सिंहासोबत श्वानने दोन हात केल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. श्वानच्या धाडसाचे कौतुक नेटीझन्स करत आहेत. या श्वानचं धाडस बघून नेटकऱ्यांनी देखील आश्चर्याने तोंडात बोटं घातली आहेत, तसेच श्वानचं नशीब बलवान होतं म्हणून या सिंहाशी केलेल्या लढाईत वाचला असंही लोक म्हणत आहेत.
दोन दिवसांपूर्वी गीर अभयारण्यात सिंहाने श्वानवर हल्ल्याच्या उद्देशानं झडप घातली. मात्र श्वाननेही हार न मानता सिंहाचा प्रतिकार केला. श्वानचा प्रतिहल्ला यशस्वी झाल्यानं सिंहाला कुत्र्याची शिकार करता आली नाही. अखेरीस श्वान आणि सिंह आपापल्या वाटेनं निघून गेले.
या व्हिडीओमध्ये सिंह जंगलातल्या झाडांपाशी झोपलेला असताना शेजारून एक श्वान जाताना दिसतोय. सिंह आपल्या पंजानी वार करत असताना श्वाननेही पळून जाण्याऐवजीची पलटवार करताना दिसत आहे.