सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ प्राण्यांचेही असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे तर काही पोट धरून हसायला लावणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये समुद्रकिनारी विश्रांती करणाऱ्या पक्षांना एक कुत्रा त्रास देताना दिसत आहे. हा कुत्रा पक्ष्यांना त्रास देण्यासाठी ते बसलेल्या ठिकाणी जोरात धावत सुटतो. पण पुढे जाऊन त्याची ही मस्ती अंगलट येते. पाहा नेमकं काय घडतं.
व्हायरल व्हिडीओ:
आणखी वाचा- Video: स्कूटर पार्क करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच
आणखी वाचा- Video: मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला घडली जन्माची अद्दल; दरवाजाजवळ जाताच काय घडले पाहा
पक्ष्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करणारा हा कुत्रा वेगाने धावत असताना स्वतःच पाण्यात पडतो. वेगात धावत असल्यामुळे त्याला समोर पाणी असल्याचे लक्षात येत नाही, त्यामुळे तो जोरात आपटतो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झाले असून, कुत्र्याला लगेच त्याच्या आगाऊपणाची शिक्षा मिळाली अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.