श्वान हा सर्वात इमानी प्राणी आणि माणसांचा जवळचा मित्र मानला जातो. आपल्या मालकाची साथ हा प्राणी शेवटपर्यंत देतो. वेळप्रसंगी मालकाप्रती इमान राखत त्याच्यासाठी आपला जीवही धोक्यात घालायला हा प्राणी मागेपुढे पाहत नाही. याची प्रचीती पुन्हा एकदा आली. आपल्या मृत मालकीणीची वाट पाहत एक श्वान तब्बल ८० दिवस रस्त्यावर बसून होता. याच रस्त्यावर ऑगस्ट महिन्यात एका कार अपघातात त्याच्या मालकिणीचा मृत्यू झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपली मालकीण परत येईल या आशेनं हा श्वान तिथेच बसून राहायचा. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंगोलियातच्या होहोत शहरातला हा व्हिडिओ आहे. १६ लाखांहून अधिक लोकांनी तो सोशल मीडियावर पाहिला आहे. नोव्हेंबर महिन्यात हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला. या श्वानाला अनेकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्या जागेवरून हटायाला तयार नाही.

आजच्या जगात रक्ताचं नातंही पाठ फिरवाना दिसून येतं मात्र या श्वाननं मालकीणीच्या मृत्यूनंतरही तिच्याप्रती इमान राखलं हे पाहून अनेकांनी त्या श्वानाच्या प्रेमाचं कौतुकं केलं आहे.