सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात पाळीव प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. पाळीव प्राणी कुत्रा, मांजरींना घरातील सदस्य असल्यासारखी वागणूक कुटुंबीय देतात. कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी आहे. तुम्ही त्याला जेवढा जीव लावाल त्याच्या दुप्पट तो तुम्हाला जीव लावत असतो. कुत्र्यासह अनेक पाळीव प्राण्यांनी आपल्या मालकाच्या प्रेमाची परतफेड केल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एक मजूर जमिनीत बनवलेल्या खड्ड्यात शिरलेला दिसतो. तो फावड्याने माती बाहेर फेकत आहे. त्याच्या शेजारी उभा असलेलं एक काळ्या रंगाचं पिल्लू आपल्या पुढच्या दोन्ही पायांनी बाहेर आलेली माती मागे ढकलताना दिसत आहे. त्याचे पाय खूपच लहान आहेत, त्याला जास्त माती काढता येत नाही. परंतु तरीही तो माती काढून मजुराला मदत करण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच रामसेतू बनविताना सिंहाचा वाटा उचलणारी खारुताई आठवेल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Tomato Price Hike: युरोपच्या बाजारात टोमॅटो कोटींच्या भावात! ३ कोटी फक्त एक किलो बियांसाठी…
या पिल्लामध्ये मालकाला मदत करण्याची इच्छाशक्ती पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही या कुत्र्याच्या पिल्लाचं कौतुक करत आहेत.