सोशल मीडिया हे असे एक माध्यम आहे, जिथे विविध प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात. इथे कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. अनेकदा वेगवेगळे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधीकधी हसवणारे असतात तर कधीकधी भावूक करणारे असतात. कधी कधी एखादा व्हिडिओ पाहून आपला मूड देखील ठीक होऊन जातो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे.

कुत्रा(dog) हा लाडक्या पाळीव प्राण्यांपैकी एक आहे. त्याला निष्ठावान म्हटलं जातं. यामुळेच जेव्हा त्यांच्याशी संबंधित व्हिडिओ इंटरनेटवर येतात तेव्हा ते प्रचंड व्हायरल होतात. आता समोरचा हा व्हिडिओ पाहा, त्यात एक कुत्रा मगरीसारखा पाण्यात लपून बसलेला दिसत आहे. हे पाहिल्यानंतर बहुतेक लोकांना सुरुवातीला मगरीचा भास होतो. मात्र, नंतर कुत्रा असल्याचे समजते.

( हे ही वाचा: ‘आधी मान पकडून पाण्यात नेले आणि नंतर….’; नदीकाठी पाणी पित असताना चित्त्यावर मगरीने केला खतरनाक हल्ला, पाहा व्हिडिओ)

डॉगीचा व्हिडिओ येथे पहा

( हे ही वाचा: “तुझ्या बुलेटची फटफट बंद कर…”; म्हशीने दाखवला असा इंगा की तरुणाला घडली जन्माची अद्दल)

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाण्याच्या आतमध्ये कुत्रा मगरीसारखा लपलेला दिसत आहे. सुरवातीला मगरच असल्याचे वाटते. कुत्र्याचे फक्त थोडीशी मागची बाजू आणि डोके बाहेर होते, बाकीचे शरीर पाण्याखाली होते, परंतु यावेळी कुत्र्याचा एक साथीदार येतो आणि तो त्याला त्रास देऊ लागतो. पाण्यात बुडलेला कुत्रा सुद्धा मगरीसारखा आपल्या साथीदारावर सक्रिय होऊन त्याच्यावर हल्ला करतो.

@Yoda4ever नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत त्याने कॅप्शन दिले – यूकेच्या साउथ वेल्समध्ये मगरीची एक नवीन प्रजाती सापडली आहे. एका यूजरने म्हटले की हा कुत्रा खरोखरच मोठा सैतान आहे..! तर दुसऱ्याने व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट केली की, ‘कुत्रा पाण्याखाली तपश्चर्या करत असल्याचे दिसत आहे.’ दुसऱ्या युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘हे दुरून मगरीसारखे दिसत होते. अप्रतिम..

Story img Loader