Dog Funny Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातील अनेक व्हिडीओ आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात, तर अनेक व्हिडीओ आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मीडियावर एका कुत्र्याचा एक सुपर क्यूट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा स्वतःलाच पाहून इतका घाबरतो की, गडबडीत पायऱ्यांवरून उतरताना त्याचा तोल जातो आणि धडपडतो. व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच हसू येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर पाळीव कुत्र्यांच्या गोंडस व्हिडीओंची कमतरता नाही. अशाच एका मोहक व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा स्वतःलाच पाहून घाबरलाय. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गोंडस कुत्रा आपल्या नादात घरात खेळताना दिसत आहे. घरात खेळण्यात व्यस्त असलेल्या या गोंडस कुत्र्याने स्वतःलाच काचेमध्ये पाहिलं आणि तो घाबरून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. या नादात त्याच्या मार्गात पायऱ्या येतात. त्या पायऱ्यांवरून उतरत असताना तो इतका गडबडून जातो की त्याला पायऱ्यांवरचा तोल बिघडतो आणि घरंगळत घसरून पुढे येतो. खरं तर घरात कुठल्यातरी काचेमध्ये स्वतःचंच प्रतिबिंब पाहताना कुत्र्याला असे वाटते की पलीकडे कोणीतरी आहे, म्हणून ते घाबरतात. स्वतःचेच प्रतिबिंब पाहून कुत्रे घाबरल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हा व्हिडीओ सुद्धा प्रचंड व्हायरल होतोय. हा मजेदार व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसायला येईल.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एका मिनिटात दहा वेगवेगळे एक्सप्रेशन्स आणि अ‍ॅक्सेंटमध्ये नक्कल करते ही महिला

याहूनही मजेदार गोष्ट म्हणजे इतकं घाबरून पाऱ्यावरून घरंगळत पुढे आल्यानंतर हा कुत्रा त्याच्या चेहऱ्यावर असे हावभाव दाखवतो की जसं काही घडलंच नाही. तो कशाला घाबरलाच नाही. इतके गोंडस हावभाव पाहून सारेच जण क्यूट कुत्र्याच्या प्रेमात पडू लागले आहेत. हा व्हिडीओ Doggos Doing Things या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा : सांगा प्राणी कोण? बिबट्याची शेपूट आणि पाय ओढून खेचत होता, लोक VIDEO बनवत राहिले…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पाकिस्तानींनी ‘चप्पल मार मशीन’चा लावला शोध, लोक म्हणाले, “अप्रतिम ऑटोमेशन!”, कमेंट्सचा महापूर!

त्यानंतर हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागला की या व्हिडीओला आतापर्यंत १.३ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तर ६४ हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यांनतर कुत्र्याच्या स्थितीबाबत विचारणा देखील केली. तर काही युजर्सनी या कुत्र्याची मजा पाहून हसू आवरणं अवघड होत असल्याचं सांगितलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dog hilariously scares herself falls down the stairs watch viral video prp