Dog Viral Video: प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. अनेकदा लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांचे काही सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करतात, ज्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर दररोज पाहिले जातात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक जर्मन शेफर्ड कुत्रा मंदिरात घंटा वाजवताना दिसत आहे.
नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मंदिराच्या आत एक कुत्रा दिसत आहे, जिथे त्याच्या समोर मंदिरातील घंटा दिसत आहे. व्हिडिओमध्ये हा कुत्रा घंटेची दोरी पकडून वाजवताना दिसत आहे, जे पाहून सोशल मीडिया यूजर्सही हैराण झाले आहेत. एका माणसाप्रमाणे हा कुत्रा घंटा वाजवत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून लोक या व्हिडिओला भरपूर पसंती दाखवत आहेत.
( हे ही वाचा: Video: फिल्मी स्टाईल प्रपोज करायला गेला अन् तोंडावर पडला, तरुणीने पायाने केलेली ‘ही’ चूक पडली महागात)
येथे व्हिडिओ पहा
( ह ही वाचा: Video: हळदी सोहळ्यापासून ते लग्नाच्या विधीपर्यंत असं पार पडलं दोन कुत्र्याचं लग्न, पाठवणीचा भावूक प्रसंग पाहाल तर…)
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो लोक खूप बघत आहेत आणि शेअर करत आहेत. व्हिडिओमध्ये जर्मन शेफर्ड डॉगी मंदिराच्या आत घंटा वाजवत आनंद व्यक्त करत आहे. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३.५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओला ४ लाख ३७ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.