आपल्यापैकी अनेकांना अनेक मित्र-मैत्रिणी असतात पण त्यांच्यापैकी खरा मित्र किंवा मैत्रीण कोण असे विचारले तर एखाद-दुसरा व्यक्ती खरा मित्र-मैत्रिणी असते. असं म्हणतात, संकट काळात समजते खरा मित्र कोण अन् खरा शत्रू कोण? खरंच आहे जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा फक्त खरा मित्र- खरी मैत्रिणच साथ देतो. कोणते मित्र-मैत्रिणी स्वार्थासाठी आपल्याबरोबर आहेत अन् कोणते मित्र मैत्रिणी निस्वार्थपणे आपल्याबरोबर आहेत हे संकटाच्या वेळी समजते. अनेकदा आपण एखाद्या मित्र-मैत्रिणींवर डोळे झाकून विश्वास ठेवतो पण अशी व्यक्तीच आपली फसवणूक करते. तर अनेकदा आपण एखाद्याबरोबर फार घनिष्ठ मैत्री नसली तरी तो व्यक्ती गरज पडल्यावर मदतीला धावून येतो. खरी मैत्री काय आहे हे आपल्यापैकी अनेकांनी खऱ्या आयुष्यात अनुभवले असतील. पण माणसांपेक्षा प्राण्यांना खऱ्या मैत्रीची किंमत आणि आदर जास्त असतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दोन कुत्र्यांचा व्हिडीओ पाहून खरी मैत्री काय असते हे लक्षात येईल.

हेही वाचा – ‘इस प्यार को क्या नाम दूं?’, कुत्रा आणि माकडाचं गच्चीवरचं प्रेम; VIDEO पाहून नेटकरी अवाक्; म्हणाले, “जोडी लाखात एक…”

इंस्टाग्रामवर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच दोन कुत्र्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर एक कुत्रा वाहून जाताना दिसत आहे. तर ओढ्याच्या किनारी असलेल्या कठड्यावरून दुसरा कुत्रा त्याला वाचवण्यासाठी धावताना दिसत आहे. पाण्यात वाहून चाललेला कुत्रा बाहेर पडण्यासाठी धरपडत आहे. शेवटी आपल्या मित्राला वाचवण्यासाठी दुसरा कुत्रा आपला जीव धोक्यात टाकून पाण्यात उतरतो. पोहत पोहत आपल्या मित्राजवळ पोहोचोतो. त्याचा कान तोंडा पकडतो आणि त्याला ओढत किनाऱ्यावर आणतो. दोन कुत्र्यांची ही निर्मळ मैत्रीनपाहून नेटकऱ्यांच्या डोक्यात अश्रू दाटले आहे.

हेही वाचा – “हॅकर्सला म्हणा, ‘निरस्त्र भव!’”, सायबर सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी वापरले ‘हॅरी पॉटरचे जादूई मंत्र; Viral Post बघाच

व्हायरल व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा” तसेच व्हिडीओवर देखील मजकूर दिसत आहे ज्यामध्ये लिहिले आहे की, “मित्रा, माझ्या मैत्रिचा थोडा मान ठेव, तुझ्या सुखात मला विसरून जा, पण दुःखात मला लक्षात ठेव!”

व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले, प्राण्यांमध्ये प्रामाणिक दोस्ती आहे मित्रा पण माणसांमध्ये नाही.”

“मित्रांना सूखात नाही तर दु:खात साथ द्या.” असे दुसऱ्याने लिहिले.

तिसरा म्हणाला, “हीच खरी मैत्री”