Shocking video: मगर ही एका फटक्यात समोरच्या प्राण्याचे दोन तुकडे करते. वेळ प्रसंगी ती वाघ सिंहच काय अगदी शार्क माशाशी सुद्धा पंगा घेण्याची क्षमता ठेवते. त्यामुळेच बहुदा मगरीला पाण्यातील राक्षस असं म्हणतात. पण याच मगरीशी चक्क एका कुत्र्यानं पंगा घेतला. कुत्र्यानं मगरीवर जोरदार हल्ला केला. मगरीनं देखील पलटवार करत कुत्र्याला प्रत्युत्तर दिलं. पण कुत्रा आणि मगरीच्या लढाईत जिंकलं तरी कोण? हे घनघोर युद्धा पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल.
मगर हा अत्यंत हिंस्त्र प्राणी आहे. एकदा का मगरीने कुणाला जबड्यात पकडले तर त्या प्राण्याचा जीव गेलाच म्हणून समजा. पण एक कुत्रा मगरीच्या जबड्यातून अगदी सहज बाहेर पडलाय. खरंतर मगरीन त्याला आपल्या जबड्यात पकडलेलंच पण कुत्र्यानं असं काही केलं की मगरीने स्वत: हुनच त्याला जबड्यातून सोडलं आणि स्वत:च शिकार झाली. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच एका कुत्र्यानं चक्क मगरीला आस्मान दाखवलंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं…
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तलावात मगर कुत्र्याची शिकार करत असताना तिच स्वत:च शिकार झाली आहे. एक मगर शिकार करण्याच्या उद्देशानं नदीमध्ये फेरफटका मारतेय. पण तिला काय माहित की आज शिकाऱ्याचीच शिकार होणार आहे. एका कुत्र्यानं गुपचूप नदीमध्ये उडी मारली आणि मगरीवर झडप घालून एका फटक्यात तिची शिकार केली. कुत्रा एका लहानशा मगरीवर हल्ला करत आहे. तो आपल्या अणकूचीदार दातांनी मगरीला चावण्याचा प्रयत्न करतोय. मग या मगरीला घेऊन तो किनाऱ्यावर आला आणि आपल्या मित्राच्या मदतीनं शिकार बाहेर काढली. दोन कुत्र्यांनी मिळून एका महाकाय मगरीची शिकार केली.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “हे फक्त भारतात होऊ शकतं” एवढी थंडी की व्यक्ती थेट जळत्या लाकडावर जाऊन झोपला; VIDEO पाहून चक्रवाल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @AjitSinghRathi नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, एकानं म्हंटलंय “घाबरला की संपला” आणखी एकानं म्हंटलंय “हिम्मत दाखवली तर सगळं शक्य”