सोशल मीडियावर प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असता. कधी कुत्र्या-मांजराची मज्जा मस्ती सुरु असते तर कधी काही अशा करामती करतात की सगळे थक्क होऊन जातात. कित्येक लोकांना प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ पाहायला खूप आडवडतात. सध्या असाच एक गोंडस व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक कुत्रा आपल्या मालकिनेबरोबर भांडताना दिसत आहे. होय….तुम्ही योग्य तेच ऐकताय. पण तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. विश्वास बसत नसेल तर तुम्ही हा व्हिडीओ पाहा. व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल.
हा व्हिडीओ युट्यूबवर व्हायरल हॉग या अकांऊवर पोस्ट केला आहे.
हेही वाचा – तलावात न पोहता तरंगतोय ‘हा’ तरुण, ही जादू नव्हे, विज्ञान आहे! वाचा काय आहे प्रकरण
व्हिडीओची सुरुवातीला दिसते, रुममध्ये सर्व पसारा दिसत आहे आणि दुसरेकडे एक कुत्रा उभा आहे जो आपण काहीच केलं नाही असा आव आणून उभा आहे. त्यानंतर मालकिन कुत्र्याला विचारते हे कोणी केले? अतिशय नाटकी स्वरुपात हा कुत्रा आपल्या मालकिनीबरोबर भांडताना दिसत आहे. मोठ मोठ्या न थांबता ओरडत आहे, भुंकत आहे. जोपर्यंत मालकिन शांत होत नाही तोपर्यंत तो काही वेळ तो असाच ओरडत राहतो. कुत्र्याचा हा गोंडस व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. लोकांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
एका यूजरने कमेंटमध्ये लिहले की, ”हे प्रत्यक्षात एक हुशारी आहे. जर तिला ऐकू येत नसेल तर मालक त्याच्यावर ओरडू शकत नाही”