सोशल मीडियावर या ना त्या कारणाने रोज कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल होत असतो. त्यात प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात. कधी कधी त्यांची माणसांप्रमाणे वागण्याची कृती पाहून हसू आवरत नाही. भारतात गेल्या काही वर्षात मोमोज चांगलच प्रसिद्ध झालं आहे. खवय्ये आपल्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी मोमोजला पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे आता नाकानाक्यावर मोमोजची दुकानं पाहायला मिळत आहेत. माणसांचं ठिक आहे पण प्राण्यांमध्येही मोमोजची क्रेझ पाहायला मिळत आहे. असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात कुत्र्याची मोमोज खाण्यासाठीची धडपड दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा त्याच्या मालकासोबत घरात बसलेला दिसत आहे. कुत्र्याच्या शेजारी बसलेला मालक मोमोज खात आहे. मालकाला पाहताच कुत्राही मोमोज मागू लागतो. यावर ती व्यक्ती वेळ न घालवता कुत्र्याला मोमोज देते, पण कुत्रा मोमोज खात नाही. कुत्रा चटणीसोबत मोमोज खाण्याचा आग्रह धरतो. चटणीकडे इशारा करत मागतो. मालकाने मोमोज चटणीत बुडवून दिल्यानंतर लगेचच कुत्रा खातो.

कुत्र्याचे नखरे पाहून नेटकरी मजेशीर कमेंट्स करत आहेत. त्याचबरोबर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून कमेंट्स करण्यासाठी नेटकऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dog momos eating video viral on social media rmt