सर्व प्राण्यांमध्ये मानव हा सर्वात बुद्धीमान प्राणी आहे असे म्हटले जाते. लहानपणापासून आपल्याला काय योग्य-काय अयोग्य शिकवले जाते तरीही अनेकदा आपल्याला त्याचा विसर पडतो. चुकीचे आहे माहित असूनही अनेक लोक सरार्सपणे नियमांचे उल्लंघन करतात ज्यामुळे तो स्वत:बरोबर इतरांचा जीव धोक्यात घालतात. पण मुक्या प्राण्यांना मात्र एकदा एखादी गोष्ट शिकवली तर ती ते कधीही विसरत नाही. मग तो प्रामाणिकपणा असो, दुसऱ्यांवर भरभरून प्रेम करणे असो की नियम पाळणे असो. माणसापेक्षा मुके प्राणी खुप चांगल्या पद्धतीने नियमांचे पालन करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका शिस्तप्रिय कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुत्रा रस्ता ओलांडताना वाहतूकीच्या नियमांचे पालन करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुत्रा रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगसमोर उभा आहे. शिस्त प्रिय कुत्रा रस्त्याच्या बाजूला उभा आहे तर त्याच्या समोर एक महिला झेब्रा क्रासिंगवरच उभी असलेली दिसते. लाल सिग्नल असल्यामुळे वाहनांची ये-जा सुरु आहे. सिग्नल लाल असतानाच महिला थेट सिग्नल क्रॉस करून निघून जाते. पण कुत्रा मात्र लाल सिग्नल हिरवा होईपर्यंत तिथेच थांबतो. सिग्नल हिरवा झाल्यानंतर रस्ता ओलांडतो. शिस्तप्रिय कुत्र्याची ही कृती पाहून नेटकरी खूश झाले आहे. वाहतुकीचे नियमांचे पालन करावे हे जर मुक्या प्राण्याला कळत असेल तर माणसांना अजून का समजत नाही. इंस्टाग्रामवर malladi_rag’s नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “एक जबाबदार शिस्तप्रिय नागरिक व्हा”

video of Reunion Missing Dog and owner missing dog
Video : दोन महिन्यापूर्वी हरवलेला कुत्रा अचानक भेटला, तरुणी मिठी मारत ढसा ढसा रडली, व्हिडीओ पाहून व्हाल भावुक
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Viral Video Of pet dog
VIDEO: ‘भिंतीवर टांगून ठेवेन…’ घरात वस्तूंची फेकाफेकी करणाऱ्या श्वानाची आईने काढली खरडपट्टी; पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही हसाल
Two dogs stood outside the door all night for roti
दोन श्वानांचा जगण्यासाठी संघर्ष; एका भाकरीसाठी ते रात्रभर दाराबाहेर उभे राहिले… PHOTO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली खंत
rabbit and dog viral video
‘शेवटी त्याच्या जीवाचा प्रश्न होता…’ कुत्र्याच्या तावडीतून वाचण्यासाठी ससा वाऱ्याच्या वेगाने धावला; पण पुढच्या पाच सेकंदांत जे घडलं… पाहा थरारक VIDEO
Sangamner case registered rottweiler dog breed
संगमनेर मध्ये कुत्र्यावर गुन्हा दाखल होण्याचा अजब प्रकार !
Do You Know Why dogs chase their own tails
Why Dogs Chase Their Tails: तुमचाही श्वान शेपटीचा पाठलाग करतो का? असू शकते ‘या’ गंभीर समस्यांचे लक्षण, कशी सोडवाल ही सवय?
Poisoning stray dogs , Cooper Hospital, stray dogs,
मुंबई : कूपर रुग्णालयात भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग

हेही वाचा – “पुणेकरांचा नादखुळा!” पावसाचा आनंद लुटणाऱ्या पुणेरी तरुणाचा व्हिडीओ बघाच, पोटधरुन हसाल

नेटकऱ्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कमेंट करून कुत्र्याच्या कृतीचे कौतू केले आहे. एकाने लिहिले, “किती गोड, किती हुशार, देव तुझे भले करो”

हेही वाचा – ‘पंचायत’ वेबसिरीजमधील प्रसिद्ध फुलेरा गाव पाहिले का? Viral Video पाहून चाहते झाले खूश, म्हणाले, “रस्ता….”

दुसऱ्याने लिहिले की, शाब्बास बेबी, फार गोड, माणसाने मुक्या प्राण्याकडून शिकले पाहिजे.

तिसऱ्याने लिहिले, “भटके कुत्रे अत्यंत हुशार आहेत.”

Story img Loader