सोशल मीडियावर पाळीव कुत्र्यांच्या गोंडस व्हिडीओंची कमतरता नाही. अशाच एका मोहक व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा स्वतःच्याच सावलीसोबत खेळताना दिसून आला. खास बाब म्हणजे स्वतःची सावली पाहून हा कुत्रा अजब हावभावही देत आहे. या व्हिडीओला सोशल मीडिया यूजर्सची भरपूर पसंती मिळत आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, घरात एक कुत्रा इकडे तिकडे उड्या मारताना दिसून येत आहे. घरातल्या फरशीवर आपल्या पायाखाली स्वतःचीच सावली पडलेली पाहून हा कुत्रा गोंधळून गेला आहे. आपल्यासारखंच कोण तरी फरशीवर दिसत असल्याचं पाहून हा कुत्रा मग सावलीसोबत खेळू लागतो. या क्लिपमध्ये कुत्रा फरशीवर उड्या मारून मजा घेताना दिसत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाबो! करोना लस पाहताच ‘तो’ घाबरला अन् मोठमोठ्यानं रडायला लागला, मग जे झालं ते पाहून पोट धरून हसाल

काही वेळाने गोंडसा कुत्रा स्तब्ध होतो आणि फरशीवरील सावलीकडे एकटक पाहू लागतो. पण फरशीवर सुद्धा आपल्यासारचं कोणीतरी आपल्याकडे पाहतोय, हे समजून हा कुत्रा पुन्हा त्याच्यासोबत खेळताना दिसून येतोय. पण शेवटपर्यंत या कुत्र्याला फरशीवर नेमंक कोण आहे, जे आपल्यासारखं उड्या मारतंय आणि आपण थांबलो की आपल्याकडे पाहू लागतो, हे काही कळत नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : राणीच्या रॉयल गार्डने रूट मार्च करताना लहान मुलाला चक्क तुडवलं, पूर्ण व्हिडीओ पाहण्याचं धाडस होणार नाही

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : रस्त्यावरून चालता चालता अचानक वीज अंगावर पडली, चारही बाजुने आगीच्या ठिणग्या उडाल्या अन् क्षणात झाला चमत्कार

हा व्हिडीओ ट्विटर अकाउंट Buitengebieden नावाच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सच्या भलताच पसंतीस उतरत आहे. अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, हा कुत्रा किती स्मार्ट आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, केवळ कुत्राच नाही तर प्रत्येकच प्राणी स्वतःची सावली पाहिल्यावर असंच करतो. आणखी एकानं लिहिलं, मला वाटतंय, या कुत्र्याला डेटवर जायचं असेल. म्हणूनच सावलीसमोर उभा राहून ते उड्या मारत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dog plays with his own shadow in adorable viral video so cute says internet prp