Viral Video Today: देशभरात श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रद्धाचा बॉयफ्रेंड आफताब पुनावाला याने तिचा खून केला वर तिच्या मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे करून ते जंगलात फेकले. श्रद्धाच्या पाठोपाठ अनेक ठिकाणहून अशाच खुनाच्या गंभीर घटना समोर येत होत्या. मात्र आता समोर आलेला काही फोटो केवळ धक्कादायकच नव्हे तर एखाद्या हॉरर चित्रपटाचा सीन वाटेल इतके अविश्वसनीय आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही फोटोंमध्ये चक्क एक कुत्रा एका मृत व्यक्तीचे डोके तोंडात धरून फिरताना दिसत आहे.
फॉक्स न्यूजच्या माहितीनुसार सदर घटना ही मेक्सिको मधील असल्याचे समजत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.जैकेटेकस या भागातील रस्त्यावर एक कुत्रा आपल्या तोंडात माणसाचं डोकं घेऊन फिरत आहे. कुत्र्याने आपल्या जबड्यात मृत व्यक्तीचे डोके पकडले आहे. स्थानिकांनी जेव्हा हे दृश्य पाहिले तेव्हा साहजिकच त्यांचा थरकाप उडाला, यानंतर घटनास्थळी पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार सुरुवातीला खूप कष्टाने पोलिसांनी हे मृतदेहाचे डोके कुत्र्याच्या जबड्यातून बाहेर काढले. कुत्रा हे डोकं खाण्यासाठी उचलून घेऊन जात होता.
मेक्सिकन वृत्तपत्र एल युनिवर्सलने काही उपस्थितांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या घटनेनंतर मृतदेहाचे अन्य तुकडे सापडल्यावर ते ओळख पटवून घेण्यासाठी शिवण्यात आले आहेत, मात्र अद्याप या खुनाचा उलगडा झालेला नाही. या मृतदेहाला सध्या फॉरेन्सिक विभागात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी हा एखाद्या टोळीने केलेला खून असावा असा अंदाज वर्तवला आहे.
हे ही वाचा<< ३०० लोकांसमोर स्टेजवर किस केल्यानं संतापली नवरी, पोलिसांना बोलावून भर मंडपातच नवऱ्याला…
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या भागात दोन टोळ्यांमध्ये मोठी खडाजंगी झाली होती ज्यात माजी महापौरांसह १८ जणांचा मृत्यू झाला होता, या भागात ड्रग्जच्या व्यापाराचे खटलेही वाढत आहेत. या टोळ्या ड्रग्ज विकत असाव्यात असे अंदाज आहेत.