कुत्रा आणि मांजर यांच्यामधील होणारी भांडण सगक्यांना माहीत आहे. दोघे एकमेकांसमोर आले की भांडण होणार हे पक्क असतं. यांच्या भांडणाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण तुम्ही कधी या दोघांमधील मैत्री पाहिली आहे का? कदाचित नसेल. पण याच संबधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या कुत्रा आणि मांजर यांच्यामधील मैत्री आणि प्रेम दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मांजर स्विमिंग पूल मध्ये पडलेले दिसत आहे. याचवेळी त्या ठिकाणी कुत्रा येतो आणि त्या मांजरीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागतो. पण जेव्हा त्याला मांजरीला पाण्याबाहेर काढता येत नाही तेव्हा तो स्वतः त्या स्विमिंग पूल मध्ये उडी मारतो आणि स्वतःच्या पाठीवर बसवून मांजरीला पाण्याच्या बाहेर काढतो. यावेळी मांजर देखील कुत्र्याच्या पाठीवर लगेच बसते आणि दोन्ही पायांनी उडी मारत स्विमिंग पूलच्या बाहेर पडते.
येथे पाहा व्हिडिओ
( हे ही वाचा: रस्त्यावर पडलेले पैसे उचलणे ‘या’ व्यक्तीला पडले महागात; Viral Video पाहून तुम्हालाही धक्का बसेल)
हा व्हिडीओ @Gabriele_Corno या ट्विटर अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये कुत्रा आणि मांजर यांच्यामधील मैत्री खरंच पाहण्यासारखी आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३७ हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकजण या व्हिडिओवर कमेंट देखील करत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलंय की जो व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे त्याने मांजरीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी का नाही मारली, तर दुसऱ्याने म्हटलं की प्राणी हे माणसांपेक्षा हुशार असतात.