Viral video: सोशल मीडियावर अनेक मुक्या प्राण्यांचे अपघाती जीव गेल्याचे व्हिडीओ आपण पाहत असतो. कधीकधी शुल्लक कारणामुळे प्राण्यांना जीव गमवावा लागतो. मात्र, काही प्राणीप्रेमी संकटात सापडलेल्या या मुक्या जीवांना जीवदान देत असतात. प्रसंगी आपला जीव संकटात टाकून ते पक्ष्यांची मदत करत असतात. सध्या अशाच काही व्यक्तिंनी दाखवलेल्या माणुसकीचं सर्वत्र कौतुक होत आहे. रेल्वे रुळात पाय अडकलेल्या कुत्र्याला काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अजून माणुसकी जिवंत!

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रेल्वे ट्रॅकच्यामध्ये कुत्र्याचा एक पाय अडकला आहे. यावेळी सुदैवाने आजुबाजूला रेल्वे कर्मचारी आहेत. मात्र या कुत्र्याचा पाय काही केल्या निघत नव्हता, तर दुसरीकडे समोरून भरधाव वेगात एक गाडी येताना दिसत आहे. दुसरीकडे, काही लोक कुत्र्याला वाचवण्यात व्यस्त असतात. तेव्हा लोक आधी कुत्र्याचा पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. नंतर एक व्यक्ती रुळामध्ये लोखंडी सळी टाकतो आणि रुळाला लांब करतो, ज्यामुळे अखेर कुत्र्याला पाय बाहेर काढण्यात मदत मिळते आणि तो तेथून लगेचच पळ काढतो.

ही घटना मुंबईतील वांद्रे स्थानकाजवळील असल्याचं बोलंल जात आहे. कुत्र्याचा जीव वाचवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचं मोठ्याप्रमाणात कौतुक होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral Video: “बाप्पाचं रेनकोट कुठंय?” चिमुकल्याचा वडिलांना निरागस प्रश्न; नेटकरी म्हणतात खरंच, मुलं देवाघरची फुलं!

या व्हिडीओनं नेटकऱ्यांचीही मनं जिंकली आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.