Dog Playing Piano Video: कुत्रा हा मानवाचा मित्र आहे असे आपण ऐकले असेल. आपल्या मालकासाठी हा पाळीव प्राणी काहीही करायला तयार असतो. आजकाल बऱ्याच घरांमध्ये कुत्रा पाळल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर कुत्र्यांचे असंख्य व्हिडीओ, फोटो पाहायला मिळतात. श्वानप्रेमी मंडळी सतत त्यांच्या लाडक्या कुत्र्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. अशाच एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये पियानो वाजवत गाणी गात आहे, असे दिसते.

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक छोटा कुत्रा पियानो वाजवता दिसतो. व्हिडीओवर “माझ्या काकांच्या कुत्र्याला भेटा. त्याला संध्याकाळी पियानो वाजवायला आणि गाणी गायला आवडतात”, असे लिहिलेले आहे. त्यात एका मुलीचा आवाज ऐकायला येतो. ती म्हणते, “मी इथे बसल्यावर त्याने (कुत्र्याने) पियानो वाजवायला सुरुवात केली आहे. त्याचं गाणं आश्वर्यकारक आहे.” हा व्हिडीओ सर्वात आधी टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. त्या माध्यमावर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तो इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला.

आणखी वाचा – Video: फुटबॉलच्या सामन्यादरम्यान मैदानात घुसला कुत्रा, खेळाडूने दोन्ही हाताने उचललं आणि…

@doggoovibess या इन्स्टाग्राम अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला १.५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. दीड लाख लोकांना हा व्हिडीओ लाइक केला आहे. या Cute कुत्र्याच्या व्हिडीओवर लोकांना कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांना पियानो वाजवणाऱ्या कुत्र्याचे कौतुक केले आहे. एका यूजरने ‘या कुत्र्याला सध्याच्या संगीतकारांपेक्षा जास्त संगीताची जाण आहे’ असे गमतीने म्हटले आहे. दुसऱ्या यूजरने ‘गुड बॉय’ अशी कमेंट केली आहे. तर ‘तो गाण्याचा सराव करत आहे, त्याला त्रास न देता एकटं सोडा’ असे एका श्वानप्रेमीने म्हटल्याचे दिसते.