Dog vs Lion Fight video: सिंह हा जंगलातील सर्वांत खतरनाक प्राणी म्हणून ओळखला जातो. असं म्हणतात की, एकदा का सिंहानं हल्ला केला की, खुद्द यमराजदेखील त्या प्राण्याला वाचवू शकत नाही. त्यामुळेच सिंहाला जंगलाचा राजा, असं म्हटलं जातं. बरं सिंह इतका खतरनाक शिकारी आहे की, तो मोठमोठ्या हत्तींचासुद्धा फडशा पाडण्याची क्षमता ठेवतो. मग त्याच्यासमोर एखादा कुत्रा आला, तर तो त्याला थोडीच सोडणार; पण येथे आश्चर्याची बाब म्हणजे एका कुत्र्यानंच सिंहाला हुसकावून लावलं. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हीदेखील शॉक व्हाल. चक्क एका कुत्र्यानं सिंहाला घाबरवलं. किंबहुना संतापलेला कुत्रा पाहून सिंहानंच धूम ठोकली.

हा व्हिडीओ पाहून लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. पण, ही डोळ्यांसमोर घडलेली घटना असली तरी ती सर्वसाधारण घटना नक्कीच नाही. असे क्वचितच कोणी ऐकले किंवा पाहिले असेल. याच कारणामुळे ट्विटरवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, कुत्र्याला स्वत:विषयी असलेला आत्मविश्वास पाहून सारेच त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये कुत्रा थेट सिंहाला आव्हान देत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे कुत्र्याच्या या धाडसाचं साऱ्यांनाच कौतुक वाटतं आहे. कारण- हा कुत्रा सिंहाला केवळ आव्हानच देत नाही, तर त्याला ‘काँटे की टक्कर’ देऊन, माघार घ्यायला भाग पाडतो.

Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
Shocking video In Amroha, Uttar Pradesh, a girlfriend was thrown on the road and strangled
VIDEO: जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं! भर रस्त्यात गर्लफ्रेंडच्या हत्येचा प्रयत्न; खाली पाडलं, ओढणीनं गळा आवळला अन्…
Shocking video truck accident video instead of helping him some people started lotting his mobile money
माणुसकी मेली..! अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर वेदनेनं ओरडत होता अन् लोकांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
Wildebeest animal brutally attacked by lion
‘एकाला जगण्यासाठी दुसऱ्याला मरावं लागतं…’ वाइल्डबीस्ट प्राण्यावर सिंहाने केला क्रूर हल्ला; VIDEO पाहून फुटेल घाम

जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं

एक सिंह कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न करीत होता; पण कुत्रा त्या सिंहाला मोठ्या आत्मविश्वासानं सामोरा गेला. सिंह हल्ला करण्यासाठी तयारी करू लागला; पण ते पाहूनही कुत्रा बिलकूल घाबरला नाही. उलट त्यानंदेखील सिंहाला जोरदार प्रत्युत्तर दिलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन्ही सिंह पुढे येताच कुत्रादेखील त्यांच्यासमोर मोठ्या धाडसानं पुढे गेला. सिंहानं हल्ला करताच त्यानंदेखील प्रतिहल्ला चढवला. मात्र, आश्चर्य बाब म्हणजे या लढाईत अखेर कुत्र्यानंच बाजी मारली. कुत्र्याचं ते रौद्र रूप पाहून सिंहानं माघार घेतली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल… जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरू होतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जेव्हा वाहतूक पोलिसच वाहतुकीचे नियम मोडतात; लोकांनी प्रश्न विचारताच दिलं उद्धट उत्तर, संतापजनक VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ @ @susantananda3 या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘धैर्य तुम्हाला प्रयत्न करण्यास आणि अशक्य ते शक्य करण्यासाठी प्रयत्न करण्यास भाग पाडू शकते’, अशा आशयाची कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. अन् या राजाला चक्क कुत्रा पळवतोय हे पाहून सर्वांनाच आश्चर्याच धक्का बसला आहे. पण, आपल्या गल्लीत कुत्रासुद्धा सिंह होतो ही म्हण मात्र या व्हिडीओमुळे आता खरी ठरली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतंय त्याच्या प्रतिक्रिया तुम्हीदेखील आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या.

Story img Loader