Indian Railways to give this stray dog a security job : अनेक प्रकारचे प्राणी आहेत जे माणसांपेक्षा खूप चांगल्या प्रकारे वागतात. कधी कधी हे प्राणी माणसांना कसे वागले पाहिजे ते शिकवतात. अशा घटनांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. नुकताच एका श्वानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला वाटेल की, हा श्वान प्रवाशांच्या सुरक्षेची खूप काळजी घेतोय, पण असे नाही. श्वान चालत्या रेल्वेच्या दरवाज्यावर बसलेल्या लोकांवर झडप घालतोय, त्यामुळे प्रवासी आपले पाय मागे घेत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या श्वानास रेल्वेत नोकरी द्यावी, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान अनेक प्रवासी फूटबोर्डवर बसून प्रवास करतात. पोलिसांनी कितीही वेळा इशारा दिला तरी प्रवासी गाफील राहतात. अशा बेफिकीर लोकांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. अशाप्रकारे फूटबोर्डवरून प्रवास करणाऱ्यांना या श्वानाने योग्य धडा शिकवल्याचे दिसत आहे. व्हिडीओनुसार, ट्रेन रेल्वे प्लॅटफॉर्मवर येताच श्वान फूटबोर्डवर बसलेल्या किंवा उभे असलेल्या लोकांना चावा घेण्यासाठी धाव घेतो. श्वान जसा प्रवाशांना चावा घेण्यासाठी धावतो, तसे फूटबोर्डवर बसलेले तरुण सावध होऊन पाय मागे घेतात.

Shocking video a four year old girl suffered injuries after stray dogs attacked her at Hyderabad
“बापरे किती वेदना झाल्या असतील तिला” चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; लचके तोडले, फरपटत नेलं अन् शेवटी…थरारक VIDEO व्हायरल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Mahakumbh Mela Video Viral Women Fight While Traveling To Prayagraj By Train shocking video goes viral
“अरे पाप धुवायला जाताय की करायला?” कुंभमेळ्याला जाताना महिलांनी ट्रेनमध्ये अक्षरश: हद्दच पार केली; VIDEO पाहून बसेल धक्का
Viral video young boy sitting on railway track while talking phone video goes viral social Media
जीव एवढा स्वस्त असतो का? रेल्वे रुळावर फोनवर बोलत बसला; समोरुन ट्रेन आली अन्…VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Mumbai local kelvan video what is kelvan why kelvan is done before maharashtrian wedding kelvan ideas
मुंबईकर महिलांचा नाद नाय! ट्रेनमध्ये थाटात केलं केळवण; धावती ट्रेन पंचपक्वान्न अन् आनंद; प्रत्येकानं पाहावा असा VIDEO
video of Reunion Missing Dog and owner missing dog
Video : दोन महिन्यापूर्वी हरवलेला कुत्रा अचानक भेटला, तरुणी मिठी मारत ढसा ढसा रडली, व्हिडीओ पाहून व्हाल भावुक
Two dogs stood outside the door all night for roti
दोन श्वानांचा जगण्यासाठी संघर्ष; एका भाकरीसाठी ते रात्रभर दाराबाहेर उभे राहिले… PHOTO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली खंत
rabbit and dog viral video
‘शेवटी त्याच्या जीवाचा प्रश्न होता…’ कुत्र्याच्या तावडीतून वाचण्यासाठी ससा वाऱ्याच्या वेगाने धावला; पण पुढच्या पाच सेकंदांत जे घडलं… पाहा थरारक VIDEO

श्वानाच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक युजर्स वेगवेगळ्या पद्धतीने या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, या कुत्र्याला पाहून तुम्ही काहीतरी शिकले पाहिजे. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, याला रेल्वे सुरक्षेत नोकरी दिली पाहिजे. या व्हिडीओवर युजर्स अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader